• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

जत तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध – मान्यवरांचे प्रतिपादन

सांगली प्रतिनिधी :

जत, दि. १६ मे : जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भव्य भूमिपूजन समारंभास आज मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्नता लाभली.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

यावेळी जत तालुक्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “देवाभाऊ” आणि ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून जत तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “जत तालुका महाराष्ट्रात नंबर वन बनवायचा असेल तर विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून रस्ते, पाणी, शासकीय इमारती आणि मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून विकासासाठी कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.”

“गोपीचंद पडळकर विकासासाठी झटणारे नेतृत्व” – आमदार सदाभाऊ खोत

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की,
“महाराष्ट्रात मंत्रालयात २४ तास सामान्य जनतेसाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा जर एखादा आमदार असेल, तर तो म्हणजे गोपीचंद पडळकर. जत तालुक्याच्या भवितव्यासाठी आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते जीवाचे रान करत आहेत.”

“जतच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही” – जयकुमार गोरे

ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार भाऊ गोरे यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी शासन पूर्ण ताकदीने उभे असल्याचे स्पष्ट केले.
“ग्रामविकास खात्याकडे जत तालुक्यासाठी जो कोणताही विकास प्रस्ताव येईल, तो प्राधान्याने मंजूर केला जाईल. निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“विकसित जत – सक्षम जत” या संकल्पनेला उपस्थित जनसमुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आगामी काळात महायुती सरकारच्या माध्यमातून जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊन तालुक्याचा कायापालट घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Nitin Badade
Previous Post

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण

Next Post

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी एल्गार कष्टकरी संघटनेचे धरणे आंदोलन

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
18
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी एल्गार कष्टकरी संघटनेचे धरणे आंदोलन

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी एल्गार कष्टकरी संघटनेचे धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In