• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केळशीकरांच्या आंदोलनाचा दबाव; जलजीवन योजनेला ऑक्टोबरची ‘डेडलाईन’! काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषणलेखी आश्वासनानंतर १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित; ग्रामस्थांची भूमिका मात्र कायम

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
केळशीकरांच्या आंदोलनाचा दबाव; जलजीवन योजनेला ऑक्टोबरची ‘डेडलाईन’! काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषणलेखी आश्वासनानंतर १५ ऑगस्टचे उपोषण स्थगित; ग्रामस्थांची भूमिका मात्र कायम
0
SHARES
128
VIEWS
Ad 1

दापोली : केळशी गावासाठी मंजूर झालेली जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गेल्या दीड वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत योजनेचे मंजूर काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आलेले एकदिवसीय उपोषण स्थगित करण्यात आले आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी २०२७ रोजी आमरण उपोषण करण्याचा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

RelatedPosts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

केळशी गावासाठी मंजूर झालेली जलजीवन मिशन योजना मागील दीड वर्षापासून अर्धवट अवस्थेत असल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. योजना तातडीने पूर्ण करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी केळशीचे माजी उपसरपंच केदार विलास पतंगे व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी स्वरूपातही माहिती देण्यात आली होती.

दरम्यान, १३ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समिती दापोली येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व संबंधित विभागाची बैठक झाली. बैठकीत केळशी जलजीवन मिशन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेनंतर संबंधित मक्तेदार मे. वरदा प्रोजेक्ट्स यांच्याकडून योजनेचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. ऑक्टोबर २०२६ पर्यंत मूळ मंजूर योजनेतील कामे पूर्ण करून देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
यामध्ये पंप हाऊस, वीजपुरवठा, पंप डिलिव्हरी मेन पाइपलाइन तसेच गावांतर्गत पाइपलाइन आदी कामांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित मक्तेदाराकडून दिलेल्या आश्वासनाच्या आधारे ग्रामस्थांनी सध्या प्रस्तावित उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट मुदत दिली आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले नाही, तर २६ जानेवारी २०२७ रोजी केळशी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आमरण उपोषण करणार, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
त्यामुळे आता ऑक्टोबरची ‘डेडलाईन’ प्रशासन आणि संबंधित मक्तेदारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. लेखी आश्वासनानुसार योजनेचे काम प्रत्यक्षात पूर्ण होते का, याकडे केळशी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
१५ ऑगस्टचे उपोषण स्थगित झाले असले तरी ग्रामस्थांचा पाणीप्रश्न संपलेला नाही; आता लेखी आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे हीच प्रशासनाची खरी कसोटी ठरणार आहे.

Previous Post

“शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा” – शेकाप नेते भाई दिगंबर कांबळे यांचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन

Next Post

एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

Related Posts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत
Blog

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026
0
Blog

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026
0
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन
Blog

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

September 29, 2026
1
माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
8
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
Next Post
एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

एरंडोल नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत नेत्र तपासणी शिबिर!

ताज्या बातम्या

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In