• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

चाकूर प्रतिनिधी

बोथी (ता. चाकूर) येथे गाळमुक्त धरण – गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत नदी खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ तसेच जलतारा प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यात शेती करण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर अंकलकोटे, उपसभापती भुजंग शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, नगरसेवक भागवत फुले, शिवदर्शन स्वामी, राम कसबे, भालचंद्र चाटे, धनंजय चाटे, मधुकर मुंडे, नरेंद्र हाके, विष्णू तीकटे, अनिल वाडकर, संदीप शेटे, सचिन तोरे, कार्यकारी अभियंता जावेद पटेल, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, “जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून बोथी गावातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. आपल्या गावातील पाणी गावातच जिरविले पाहिजे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि पाण्याचे स्त्रोत अधिक उपलब्ध होतील.”

पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनासाठी माती परीक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता कमी पाण्यात शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बळी पाटील यांनी केले. सिद्धी शुगर अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनीही जलतारा प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मधुकर कांबळे यांनी केले.

चौकट : जलतारा प्रकल्प काय?

जलतारा प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एका एकर शेतात ५ फूट बाय ५ फूट आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे. या खड्ड्यांमुळे पावसाचे लाखो लिटर पाणी थेट जमिनीत मुरते आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होते. त्यानंतर हेच पाणी विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होते.

यंदा ‘एल निनो’चे संकट येण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गावात किमान एक हजार जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी केले.

Previous Post

खंडागळे यांच्या झेडपी उत्पन्न वाढीच्या प्रस्तावाने वेधले लक्ष

Next Post

लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post
लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In