• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
लातूर पोलिसांची ‘खाकीतील माणुसकी’; १० लाखांचे दागिने मूळ मालकास सुरक्षित परत
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

लातूर | प्रतिनिधी

लातूर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल १० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग सुरक्षितपणे मूळ मालकास परत करून खाकी वर्दीतील संवेदनशीलता आणि नैतिकतेचे दर्शन घडवले आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.१६ मे २०२६) रोजी रात्री ११ ते ११.४० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड हे आपल्या मित्रासह खाजगी वाहनाने जात असताना सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील गेट परिसरात रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद काळी बॅग पडलेली दिसली.

कर्तव्यदक्षतेने त्यांनी वाहन थांबवून बॅगची पाहणी केली. सुरुवातीला बॅगेत लहान मुलांचे कपडे, पॅम्पर्स आणि इतर साहित्य आढळले. मात्र सखोल तपासणीदरम्यान कपड्यांच्या खाली ठेवलेली एक पोटळी दिसून आली. ती उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असल्याचे आढळून आले.

प्राथमिक अंदाजानुसार, बॅगेत ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे १ तोळा चांदीचे दागिने होते. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

ही बॅग एखाद्या कुटुंबाकडून दुचाकीवरून प्रवास करताना नकळत पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन बॅग सुरक्षित ताब्यात घेतली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासांतच बॅगेच्या मूळ मालकाचा शोध लावण्यात यश मिळवले. ही बॅग प्रकाशनगर, लातूर येथील सौ. ज्योती प्रतीक पांचाळ यांची असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रविवारी (दि.१७ मे २०२६) रोजी हा मुद्देमाल पांचाळ कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

आपली मौल्यवान बॅग सुरक्षित परत मिळाल्याने पांचाळ कुटुंबीयांनी लातूर पोलिसांचे आभार मानले.

या प्रामाणिक कार्याबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांचे कौतुक केले आहे.

खाकी वर्दीतही माणुसकी, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, लातूर जिल्हाभरातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Next Post

४३ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
४३ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

४३ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In