• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खंडागळे यांच्या झेडपी उत्पन्न वाढीच्या प्रस्तावाने वेधले लक्ष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

सोलापूर | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत विशेष लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमित टपऱ्या हटवून त्याच टपरीधारकांसाठी नियोजनबद्ध गाळे बांधण्याचा पर्याय त्यांनी सभेत सुचवला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती इंद्रजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी सदस्यांनी नवे विषय आणि उपाय सुचवावेत, असे आवाहन केले होते.

त्यास अनुसरून बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी मुख्यालय परिसरात सुमारे ७५ गाळ्यांचे बांधकाम करून ते विद्यमान टपरीधारकांना देण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रस्तावावर चर्चा करताना संबंधित जागा प्रथम जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आणि कुलदीप जंगम यांनीही मुख्यालयाची जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते.

सभेत खंडागळे यांनी बोरामणी गटातील बहुतांश तांड्यांवर शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. अनेक शाळा इमारती असूनही शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी उळे येथे कायमस्वरूपी शेड उभारण्याची मागणीही त्यांनी केली.

Previous Post

कळंबोलीत पोलिसांचा ड्रग्स पेडलर्सना कडक इशारा; ‘नशामुक्त कळंबोली’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

कमी पाण्यात शेती करणे काळाची गरज : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In