• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कलिंगड कापून वाढदिवस साजरा; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
कलिंगड कापून वाढदिवस साजरा; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी / इंदापूर

सणसर येथील महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कॉम्प्युटर ऑपरेटर आणि आझाद तरुण मंडळ सणसरचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश ज्ञानदेव शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केकऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा करत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

यावेळी कलिंगड, खरबूज, पेरू आणि केळी यांसारखी फळे कापून उपस्थितांनी त्याचा आनंद घेतला. वाढदिवस साजरा करण्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना “केकऐवजी कलिंगड, खरबूज, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा, चिकू यांसारख्या फळांचा वाढदिवसात वापर करा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारपेठ मिळेल आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होईल,” असा सामाजिक संदेश देण्यात आला.

तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त केकवर खर्च केला जातो, उरलेला केक वाया जातो, तर दुसरीकडे फळांचा वापर केल्यास आरोग्यदायी आहार मिळतो आणि भारतीय संस्कृतीलाही प्राधान्य दिले जाते, असे मतही व्यक्त करण्यात आले. “पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याऐवजी आपल्या देशातील शेतकरी आणि आरोग्याला पूरक गोष्टींना प्राधान्य द्यावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे.

यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरचे माजी संचालक गणेशअण्णा झगडे, सणसर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक यजुवेंद्रसिंह उर्फ बाबाजी निंबाळकर, सोमनाथ उर्फ पिंटू गुप्ते, जगदीश कांबळे, बेलवाडी कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय पवार, काझडचे पोलीस पाटील सुरेश पांढरे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक तानाजी उर्फ बाबा निंबाळकर, सणसर ग्रामपंचायत माजी सदस्य शरददादा कांबळे, सतीशकाका थोरात, घनश्याम अण्णा भोईटे, मारुती उर्फ बंडू निंबाळकर, जयकुमार निंबाळकर, दीपक तात्या निंबाळकर, सुमित निंबाळकर सर, संजय शिंदे सर, रणजीत राजेभोसले, युवा उद्योजक अनिल माने, समाजसेवक किरण गायकवाड, अमर निंबाळकर, पांडुरंग जाधव, गोविंद जाधव, राजेंद्र नेवसे, दिनेश पाटील निंबाळकर, राजेंद्र माणिकराव रायते, रमेश रायते, अण्णासो रायते, हॉटेल साईनाथचे प्रोप्रायटर किरण पाठक, सतीश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

सपकळवाडी-हिंगणेवाडी-सणसर वॉर्डरचना वाद पेटला; “गेट हाऊसमध्ये बसून गावांचा लोकशाही निर्णय?” ग्रामस्थांचा संतप्त सवाल

Next Post

शाळा- कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले आताच काढा : तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
शाळा- कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले आताच काढा : तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर

शाळा- कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले आताच काढा : तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In