• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सपकळवाडी-हिंगणेवाडी-सणसर वॉर्डरचना वाद पेटला; “गेट हाऊसमध्ये बसून गावांचा लोकशाही निर्णय?” ग्रामस्थांचा संतप्त सवाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
सपकळवाडी-हिंगणेवाडी-सणसर वॉर्डरचना वाद पेटला; “गेट हाऊसमध्ये बसून गावांचा लोकशाही निर्णय?” ग्रामस्थांचा संतप्त सवाल
0
SHARES
80
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी / इंदापूर

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी, हिंगणेवाडी आणि सणसर ग्रामपंचायतींच्या वॉर्डरचना प्रक्रियेवर गंभीर आरोपांचे सावट निर्माण झाले असून संपूर्ण प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठी, सर्कल अधिकारी, तहसीलदार आणि प्रांत कार्यालयावर राजकीय दबावाखाली मनमानी पद्धतीने वॉर्डरचना केल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

माहिती अधिकारातून मागवण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी “जिल्हाधिकारी कार्यालयातून अंतिम सही झालेली कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत,” असे तहसील कार्यालयातील क्लार्क जनक माने यांनी सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, असे असताना तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दि. ४ मे २०२६ रोजी वॉर्डरचनेचा निकाल कोणत्या कायदेशीर आणि प्रशासकीय आधारावर जाहीर केला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. “कागदपत्रेच अंतिम नाहीत, तर निकाल कसा अंतिम?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सपकळवाडीतील वॉर्ड क्रमांक ३ संदर्भात ग्रामस्थांमध्ये विशेष संताप व्यक्त होत आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्वेकडील भागात असलेला हा वॉर्ड दक्षिणेकडून उत्तरेकडे नैसर्गिक रचनेने विस्तारलेला असताना त्याचे विभाजन करण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, वॉर्ड क्रमांक १ आणि २ मध्येच प्रत्यक्ष विभाजन होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने ते टाळून वॉर्ड क्रमांक ३ वरच कारवाई का केली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, २०२० मध्ये वॉर्ड क्रमांक ३ मध्ये तीन उमेदवार होते आणि मतदारांना तीन मतांचा अधिकार होता. आता २०२६ मध्ये वॉर्ड क्रमांक १ मध्ये तीन उमेदवारांची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या भागातील ग्रामस्थांना पुन्हा तीन मतांचा अधिकार देण्यात आला आहे. मग वॉर्ड क्रमांक ३ मधील ५४ मतदारांना तोच अधिकार घाईघाईने का देण्यात आला? यामागे कोणाचा राजकीय दबाव किंवा संगनमत आहे का, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामसेवक उज्वला भगत, सर्कल अधिकारी शरद गोडे आणि ग्रामसेवक अरुण जाधव यांनी सपकळवाडी, हिंगणेवाडी आणि सणसर गावांची वॉर्डरचना प्रक्रिया गावात न करता श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर येथील गेट हाऊसमध्ये काही ठराविक राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे “लोकशाही प्रक्रिया ग्रामसभेत झाली की गेट हाऊसच्या बंद खोलीत?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रक्रियेविरोधात सपकळवाडी येथून शत्रुघ्न घाडगे, हिंगणेवाडी येथून संतोष चव्हाण, कृष्णा कदम आणि सणसर येथून अभयसिंह निंबाळकर यांनी अधिकृत हरकती व जबाब सादर केले होते. मात्र या हरकतींचा कोणताही विचार न करता संपूर्ण वॉर्डरचना “जैसे थे” ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष पाहणीसाठी कोणताही अधिकारी गावात आलेला नसताना वॉर्डरचनेचा अंतिम निर्णय घेतल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन प्रत्यक्ष पंचनामा, लोकसंख्या अभ्यास आणि भूगोल न पाहताच केवळ कागदोपत्री निर्णय घेत आहे का, अशी चर्चा गावोगावी सुरू झाली आहे.

ग्रामस्थांनी संबंधित तलाठी, सर्कल अधिकारी आणि ग्रामसेवक यांचे तात्काळ निलंबन करून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन किंवा विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेऊन संपूर्ण वॉर्डरचना रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वॉर्डरचना प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

श्री शनिदेव जयंती व शनी अमावस्या निमित्त शनिमांडळ येथे भाविकांची मोठी गर्दी

Next Post

कलिंगड कापून वाढदिवस साजरा; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
कलिंगड कापून वाढदिवस साजरा; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श

कलिंगड कापून वाढदिवस साजरा; समाजापुढे ठेवला वेगळा आदर्श

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In