• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबानगरीत श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबानगरीत श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

काल्याचे कीर्तन, दीपोत्सव व महाप्रसादाने होणार सांगता

अंबाजोगाई | प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाच्या चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन दि. २६ मे ते २९ मे २०२६ दरम्यान सकाळी ७ ते १० या वेळेत देशपांडे गल्लीतील धाकटे देवघर येथे करण्यात आले आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

सोहळ्याची सांगता शुक्रवार, दि. २९ मे रोजी सकाळी १० वाजता हभप शिवाजी महाराज मुळे (आडस) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर पालखी उत्सव, महाआरती, महाप्रसाद, ‘सत्संग श्री गजाननाचा’ तसेच दीपोत्सवात ‘श्रीं’ची शेजारती होणार आहे.

शहरातील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने हभप वै. दत्तात्रय जोशी महाराज नळेगावकर यांच्या कृपाआशीर्वादाने गेली १३ वर्षे हा सोहळा भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यंदा या पारायण सोहळ्याचे १४ वे वर्ष असून प्रमुख उपस्थिती हभप आनंद महाराज जोशी नळेगाव यांची राहणार आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप

दि. २६ मे रोजी पहाटे ४ वाजता मंगलध्वनीने सोहळ्याची सुरुवात होईल. पहाटे ५ वाजता रुद्राभिषेक व आरती होणार असून सकाळी ७ ते १० या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण पार पडेल. सायंकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी महिला भजनी मंडळाचे सांप्रदायिक भजन तसेच हभप श्रीपाद बुवा अभ्यंकर (पिंपरी-चिंचवड) यांचे कीर्तन होणार आहे.

दि. २७ मे रोजी पारायणासोबत सरोजनी देशपांडे, वैशाली विडेकर व मधुरा बाभुळगावकर यांचे भक्ती संगीत आयोजित करण्यात आले असून, हभप प्रभंजन महाराज भगत (लोणी) यांचे कीर्तन होणार आहे.

दि. २८ मे रोजी अध्याय १५ ते २१ चे पारायण, ग्रंथपूजन, ग्रंथदिंडी व श्री गजानन महाराजांचा भव्य पालखी उत्सव पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता अंबानगरीतून पालखी मिरवणूक विविध मार्गाने काढण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा

दि. २९ मे रोजी काल्याच्या कीर्तनानंतर मंडळाच्या वतीने ‘कै. दत्तात्रय महाराज जोशी स्मृती आध्यात्मिक सेवा पुरस्कार’ हभप रामचंद्र महाराज चिंचोलकर, संभाजीनगर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

शेवटी महाआरती, महाप्रसाद, ‘सत्संग श्री गजाननाचा’ व दीपोत्सवात शेजारतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या पारायण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

वाढत्या उष्णतेत ORS चा वापर ठरतो जीवनदायी

Next Post

सायकल वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; दिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके यांचा प्रेरणादायी उपक्रम

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
2
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
15
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
सायकल वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; दिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके यांचा प्रेरणादायी उपक्रम

सायकल वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; दिनदयाळ बँकेचे सीईओ महेश शेळके यांचा प्रेरणादायी उपक्रम

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In