• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऊर्जा मित्र बैठकीत जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचा महावितरणवर सवालांचा भडिमार; लोडशेडिंग, सोलर योजना, फिडर प्रलंबित कामांवर प्रशासनाला धारेवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
ऊर्जा मित्र बैठकीत जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचा महावितरणवर सवालांचा भडिमार; लोडशेडिंग, सोलर योजना, फिडर प्रलंबित कामांवर प्रशासनाला धारेवर
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा

प्रतिनिधी | | इंदापूर

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना इंदापूर तालुका व बारामती तालुक्याच्या वतीने महावितरण विभागीय कार्यालय (परिमंडळ) ऊर्जा भवन, बारामती येथे आयोजित ऊर्जा मित्र बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक कार्यकारी अभियंता संजय सोनवणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीत ग्राहक संरक्षण परिषद पुणे सदस्य दिलीप निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष शत्रुघ्न घाडगे, वजन-माप प्रमुख दिलीप दुपारगुडे, ऊर्जा प्रमुख तानाजी खैरे तसेच बारामती तालुका अध्यक्ष श्याम कुमार उपस्थित होते. यावेळी बारामती शहर, ग्रामीण, सोमेश्वर, वालचंदनगर व इंदापूर उपविभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील गंभीर प्रश्नांवर थेट आणि आक्रमक भूमिका मांडण्यात आली. इंदापूर व बारामती तालुक्यात ग्रामीण भागात “सहा ते दहा” लोडशेडिंग लागू केले जाते, मात्र बारामती शहराला त्यातून सूट का दिली जाते? असा थेट सवाल प्रशासनाला करण्यात आला.

तसेच “मागेल त्याला सोलर”, कुसुम सौर योजना, प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणि स्मार्ट योजना यामध्ये शेतकऱ्यांना सहा ते आठ महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी दिला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. योजनांची प्रत्यक्ष जनजागृती कितपत प्रभावीपणे केली जाते, याबाबतही प्रशासनाला जाब विचारण्यात आला.

सपकळवाडी गावातील स्वतंत्र फिडरसाठी दि. २४ मार्च २०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. “गावासाठी फिडर बसविण्याच्या कामासाठी नेमकी कालमर्यादा किती? आणि विलंबासाठी जबाबदार कोण?” असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला.

बैठकीत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले :

  • ग्रामीण भागातील अनियमित व वाढते लोडशेडिंग
  • ठराविक वेळापत्रक नसलेला वीजपुरवठा
  • सहा ते दहा तास लाईट बंद ठेवून वारंवार वाढवले जाणारे शटडाउन
  • कर्मचाऱ्यांची वर्तणूक व शिस्तभंग कारवाई
  • वीजबिल वाटपातील त्रुटी
  • ग्राहकांच्या नावातील बदल प्रकरणे
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे विजेमुळे झालेले नुकसान
  • सौर योजनांच्या मंजुरीतील विलंब

जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेच्या वतीने शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडत प्रशासनासमोर ठोस भूमिका मांडण्यात आली. विशेष म्हणजे सपकळवाडी फिडरचे काम एक ते दोन दिवसांत पूर्ण करून जोडणी करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत दिले.

या बैठकीत ग्राहक संघटनेने केवळ प्रश्न उपस्थित न करता ग्रामीण भागातील वीज, शेतकरी आणि ग्राहकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवत उत्तरदायित्वाची मागणी केली. त्यामुळे ऊर्जा मित्र बैठकीत ग्राहक संघटनेचा आवाज प्रभावीपणे उमटल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक; खडकवासला पाण्यासाठी पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

Next Post

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
102
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
47
Next Post

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In