• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

नागरिक व शेतकरी हवालदिल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप

शिरूर अनंतपाळ | प्रतिनिधी

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे आणि वेळीच दुरुस्ती न केल्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चार गावे गेल्या सहा दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मुख्य वीजवाहिनीचा पोल कोसळल्याने ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा तसेच शेतातील विद्युत पंप पूर्णपणे बंद पडले असून नागरिक व शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तळेगाव (बोरी) येथील सरपंच अक्षय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे महावितरणचा मुख्य विद्युत पोल जमिनीवर कोसळला. यामुळे उजेड फिडरवरील थ्री फेस ए.जी. वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या फिडरशी जोडलेल्या उजेड, डोंगरगाव, हलकी आणि तळेगाव (बोरी) या चार गावांचा ग्रामपंचायत पाणीपुरवठा बंद पडला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

सध्या पिके आणि फळबागांना पाण्याची अत्यंत गरज असताना विद्युत पंप बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. पाणीअभावी पिके वाळण्याच्या स्थितीत आली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सरपंच अक्षय पाटील यांनी सांगितले की, पोल कोसळल्याची माहिती त्याच दिवशी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र, सहा दिवस उलटूनही दुरुस्तीसाठी कर्मचारी किंवा अधिकारी फिरकलेले नाहीत. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चार गावांतील नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. सहा दिवस पाणीपुरवठा बंद राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पुढील २४ तासांत वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर चारही गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही सरपंच अक्षय पाटील यांनी दिला.

दरम्यान, संबंधित महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Tags: Akashy Patil
Previous Post

सगळ्यांनीच पुण्यासारख्या शहरांची वाट धरली तर आपल्या गावाचा विकास कधी होणार?— निखिल नाळे

Next Post

श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post

श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक वळण; ४८ वर्षांत पहिल्यांदाच पाचपुते घराण्यातील सदस्याचा जिल्हा बँकेत प्रवेशाचा प्रयत्न

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In