• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक; खडकवासला पाण्यासाठी पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात शेतकऱ्यांचा उद्रेक; खडकवासला पाण्यासाठी पुणे–सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | | इंदापूर

इंदापूर तालुक्यात खडकवासला उजव्या कालव्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. उन्हाळी हंगामासाठी मिळणारे दुसरे पाणी आवर्तन अद्यापही सोडण्यात आले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डाळज नंबर २ चौकात रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

राज्याचे कृषिमंत्री असलेल्या तालुक्यातच शेतकऱ्यांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाण्याअभावी आधीच शेती संकटात सापडली असताना उन्हाळी आवर्तन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

आज सकाळपासून इंदापूर तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने डाळज नंबर २ चौकात एकत्र आले. “शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्या”, “उन्हाळी आवर्तन सुरू करा”, “शेती वाचवा” अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खडकवासला कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन वेळेत न मिळाल्याने पिके धोक्यात आली आहेत. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता शेती टिकवण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, “जोपर्यंत पाण्याबाबत ठोस निर्णय होत नाही आणि आवर्तन सुरू करण्याबाबत स्पष्ट आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

खडकवासल्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून इंदापूर तालुक्यातील शेतकरी आता अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Ganesh Dhanwade
Previous Post

शिर्डी येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न

Next Post

ऊर्जा मित्र बैठकीत जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचा महावितरणवर सवालांचा भडिमार; लोडशेडिंग, सोलर योजना, फिडर प्रलंबित कामांवर प्रशासनाला धारेवर

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
2
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
15
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
ऊर्जा मित्र बैठकीत जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचा महावितरणवर सवालांचा भडिमार; लोडशेडिंग, सोलर योजना, फिडर प्रलंबित कामांवर प्रशासनाला धारेवर

ऊर्जा मित्र बैठकीत जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटनेचा महावितरणवर सवालांचा भडिमार; लोडशेडिंग, सोलर योजना, फिडर प्रलंबित कामांवर प्रशासनाला धारेवर

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In