• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

लोहा | प्रतिनिधी

“स्वच्छ शहर – सुंदर शहर” या संकल्पनेला बळ देत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे असिस्टंट मॅनेजर तथा लोह्याचे भूमिपुत्र अमोल बालाजी चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रम राबवत शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना तब्बल ४५० कचराकुंड्यांचे वाटप केले. तसेच जुन्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सिमेंट बाकडीही उपलब्ध करून देण्यात आली.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षांपासून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणारे अमोल चव्हाण हे “एबीसी” नावाने तालुक्यात परिचित आहेत. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि समाजकार्याची आवड यामुळे त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अमोल चव्हाण हे लोह्याचे माजी सरपंच यशवंतराव चव्हाण यांचे नातू तर राजर्षी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन बी. वाय. चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे कुटुंब सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून मोठे बंधू पोस्ट विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

शनिवारी (४ जुलै) बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कचराकुंडी वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाराती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा युवा नेते नवनाथबापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते केरबाजी बिडवई, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल, गटनेते भास्कर पवार, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, भीमराव पाटील शिंदे, संभाजी चव्हाण, श्यामराव पवार, गणेश बगाडे, सुधाकर पाटील, तुकाराम दाढेल, पंकज परिहार, सतीश निखाते, विलास कहालेकर, सचिन मुकदम, सदा तेलंग, नारायण यल्लरवाड, मारुती जंगले, अविनाश पवार, सिकंदर शेख, श्रीकांत मंजलवाड, राजेश बोडके, इरबा पवार, शंकर वट्टमवार, मॅनेजर बाहेती यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, दुकानदार तसेच हातगाडी व्यावसायिकांना कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष शरद पवार यांनी अमोल चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शहरातील वृक्षारोपणासाठी लोखंडी जाळ्या उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. उद्घाटक नवनाथबापू चव्हाण यांनीही अमोल यांच्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.

याशिवाय शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. जुन्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची बाकडी देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

महेश चव्हाण, साई चव्हाण, प्रशांत शिंदे, संदीप पांचाळ, सूर्यकांत जामगे, मुकुल पवार, रमेश पवार, गजानन दांगटे आणि मित्रपरिवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

वाढदिवसानिमित्त सामाजिक दायित्व जपत शहर स्वच्छता मोहिमेला हातभार लावणाऱ्या अमोल चव्हाण यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Tags: Hanumant Panchal
Previous Post

रानडुकरांनी तूर केली फस्त; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Next Post

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In