• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टिटवाळ्यात बेकायदा चाळींचे जाळे; ४१ भूमाफियांवर गंभीर आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

कल्याण | प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक भागांमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असताना टिटवाळा अ प्रभागात मात्र मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळींचे बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. टिटवाळा, बनेली, बल्याणी आणि वासुंद्री परिसरातील सरकारी व मोकळ्या जमिनींवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून चाळी उभारल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

RelatedPosts

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

विशेष म्हणजे या भागात पालिकेचे वरिष्ठ पदाधिकारी वास्तव्यास असतानाही बेकायदा बांधकामांचा वेग कमी न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील पाच ते दहा वर्षांत टिटवाळा परिसरात आठ ते दहा हजार बेकायदा चाळी उभारण्यात आल्या. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही जागरूक नागरिकांनी या प्रकरणाच्या तक्रारी ईडी, आर्थिक गुन्हे शाखा आणि शासनस्तरावर केल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतून आले, भूमाफिया बनले

स्थानिकांच्या दाव्यानुसार, मुंबईतील तुर्भे, देवनार, भायखळा, अंधेरी, भांडुप, मालाड आणि मुंब्रा परिसरातून काही लोक टिटवाळ्यात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी स्थानिक दलाल, काही अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने बेकायदा चाळी उभारण्याचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप आहे.

सरकारी मालकीच्या बेवारस जमिनींवर झपाट्याने चाळी बांधून प्रत्येकी पाच ते सहा लाख रुपयांना खोल्या विकल्या जात असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

प्रशासनावर संगनमताचे आरोप

बेकायदा बांधकामांमुळे नैसर्गिक नाले, पाणवठे आणि मोकळ्या जागा नष्ट होत असून शहराचे नियोजन बिघडल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. काही स्थानिक राजकीय पुढारी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आश्रयामुळेच हा व्यवसाय वाढल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

भूमाफियांची नावे चर्चेत

स्थानिक नागरिकांनी काही कथित भूमाफियांची नावे पुढे आणली असून, विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळी उभारल्याचे सांगितले आहे. यामध्ये अरमान इद्रीसी, शफिक पठाण, नसीम खान, गुड्डू शेख, इरशाद अन्सारी, जुबेर मोगल, अक्रम सिद्दीकी, मोहम्मद गुजर, रव्वाब खान, इक्बाल अन्सारी, नूर मोहम्मद, अविनाश भगत, जाहिद आझमी यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिकांनी बेकायदा बांधकामांविरोधात कठोर पावले उचलण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.

Previous Post

जीवनातील ७५ वे रक्तदान करून विलासराव पाटील चाकूरकर यांचा प्रेरणादायी आदर्श

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’ पाटणबोरीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Related Posts

Blog

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
1
Blog

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
12
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
17
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
91
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
8
Blog

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
12
Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’ पाटणबोरीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In