• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

Pratik Tidke by Pratik Tidke
August 17, 2026
in Blog
0
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

कळंब तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

कळंब- भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, कळंब तालुक्यातील काही शासकीय कार्यालयांच्या इमारतींवर १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज उभारण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
कळंब तालुक्यातील खामसवाडी व मंगरूळ येथील महावितरण कार्यालये तसेच मस्सा(ख) येथील महावितरण कार्यालय आणि आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतीवर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उभारण्यात आला नसल्याचे आढळून आले. याविषयी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी फोटोच्या पुराव्यासह उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिन हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या त्यागाची आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाची आठवण करून देणारा राष्ट्रीय महत्त्वाचा दिवस आहे. अशा दिवशी शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर नियमानुसार राष्ट्रध्वज उभारणे अपेक्षित असताना संबंधित कार्यालयांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज न उभारणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे संबंधित शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजासंदर्भातील शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही. त्यामुळे ध्वजारोहणासाठी जबाबदार अधिकारी कोण होता आणि राष्ट्रध्वज न उभारण्यामागील कारण काय होते, याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी विरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.

बॉक्स
महाराष्ट्र शासनाने १२ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर ग्रामीण भागात सुध्दा असे नमूद करून राष्ट्रध्वज उभारण्यात यावा असे आदेश दिले होते. तरीही अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज न उभारणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध पुराव्यासह तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल मुळे, सामाजिक कार्यकर्ते कळंब.

Previous Post

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

Next Post

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
37
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
13
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
10
Next Post
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In