• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
अण्णासाहेब पाटील महामंडळाला १५० कोटींचा निधी; डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

बीड (प्रतिनिधी ): मराठा समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी आनंदवार्ता दिली असून, अण्णासाहेब पाटील – आर्थिक मागास विकास महामंडळासाठी – पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा निधी – वितरित करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापनकरण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजातील प्रलंबित प्रश्न तसेच थकीत व्याज परतावा मिळण्या बाबत अडचणी सोडवाव्यात, यासाठी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत होत्या.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

यासंदर्भात डॉ. मेटे यांनी मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही वारंवार मागणी केली
होती. २८ मार्च रोजी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर करून महामंडळातील थकीत व्याज परतावा तातडीने वितरित करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

शासनाने या मागणीची तत्काळ दखल घेत निधी वितरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना मराठा समाजातून व्यक्त होत आहे.
निर्णयामुळे महामंडळामार्फत लाभ घेणाऱ्या मराठा तरुण उद्योजक, व्यापारी आणि बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा अजित पवार तसेच मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मराठा तरुण उद्योजक व व्यापाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून न्याय मिळवून दिल्याबद्दल शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांचेही तरुण उद्योजकांकडून आभार मानण्यात आले आहेत.

Tags: Rahul Gawli
Previous Post

कोकण दर्शनमधून घडणार संगमेश्वरची खास सफर; २२ मे रोजी आकाशवाणी रत्नागिरीवर विशेष प्रसारण

Next Post

अ‍ॅड. संदीप दातरे यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” जाहीर

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
5
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
65
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
अ‍ॅड. संदीप दातरे यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” जाहीर

अ‍ॅड. संदीप दातरे यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” जाहीर

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In