• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट; मात्र अंडरब्रिजच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
किनवट रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट; मात्र अंडरब्रिजच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

युवानेते करण एंड्रलवार यांचा रेल्वे मंत्रालयाकडे थेट पाठपुरावा; कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

किनवट | प्रतिनिधी

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमृत भारत योजनेअंतर्गत किनवट रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम वेगाने सुरू असून, रेल्वे स्टेशनचे रूपडे बदलताना दिसत आहे. मात्र, स्टेशनलगतच्या शिवाजीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या प्रकरणी युवानेते करण एंड्रलवार यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून थेट रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला असून, संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिवाजीनगर रेल्वे अंडरब्रिजच्या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणात सिमेंटची धूळ उडत आहे. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार आणि स्थानिक रहिवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.

नगराध्यक्षा सुजाता एंड्रलवार यांचीही गंभीर दखल

अंडरब्रिजचे काम सुरू झाल्यापासूनच नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी या कामाच्या दर्जाबाबत गंभीर दखल घेतली आहे. काम दर्जेदार व्हावे यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.

“अंडरब्रिजची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, रस्त्यावर त्वरित डांबरीकरण करावे आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

युवानेते करण एंड्रलवार यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार नोंदवली आहे. “एकीकडे खासदारांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट पद्धतीने होत असताना, दुसरीकडे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अंडरब्रिजचे काम अत्यंत सुमार दर्जाचे झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

रेल्वे स्टेशनप्रमाणेच अंडरब्रिजचे कामही उच्च दर्जाचे व्हावे, अशी मागणी करत त्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण किनवटकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अ‍ॅड. संदीप दातरे यांना “छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार २०२६” जाहीर

Next Post

निवघा (बा.) येथे गोपाळ समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
निवघा (बा.) येथे गोपाळ समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

निवघा (बा.) येथे गोपाळ समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In