• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निवघा (बा.) येथे गोपाळ समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
निवघा (बा.) येथे गोपाळ समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
0
SHARES
86
VIEWS
Ad 1

हदगाव | प्रतिनिधी

दि. २१ मे २०२६ रोजी गुरुवारी निवघा (बाजार), ता. हदगाव, जि. नांदेड येथे गोपाळ समाजाच्या वतीने सन २०२५-२६ च्या एस.एस.सी. शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा श्रीकृष्ण मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आगारप्रमुख तुकाराम गव्हाणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गजानन नरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष तुकाराम गव्हाणे यांनी केले.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. माधुरी रामकृष्ण कालापाड हिने ९५ टक्के गुण मिळवत निवघा येथून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. देवयानी बालाजी धनगर (९१%), कु. सुप्रिया गजानन तपासे (८८%), कु. सानिका गंगाराम मोरे (८६%), कु. गायत्री बालाजी गव्हाणे (८५%), कु. वर्षा शिवाजी गायकवाड (७९%), कु. धनश्री गजानन नरवाडे (६८%), कु. गौरी अमोल हटकर (५६%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

तसेच गोपाळ समाजातील विद्यार्थी रोशन बालाजी नरवाडे (८८%), कृष्णा बालाजी मोरे (७८%), गौरव बाबुराव मोरे (७६%), वैभव नारायण मोरे (६८%), ओंकार शिवाजी वाघमारे (६६%), ओमकार दिलीप महाजन (६२%), श्याम दिलीप गव्हाणे (६१%), गोविंद फकीरा धनगर (६१%) तसेच ओम बंडू महाजन यांनीही परीक्षेत यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल केले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. संतोष गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अधिक मेहनत घेऊन विविध क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले. “आई-वडिलांचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करा. भविष्यात शैक्षणिक अडचण आल्यास मी नेहमी सहकार्य करीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमास गणेश गव्हाणे, संतोष वाघमारे, संभाजी गव्हाणे, बाबुराव नवघरे, शिवाजी धोंगडे, सुभाष महाजन, पत्रकार देवानंद महाजन, पत्रकार अशोक गव्हाणे, पत्रकार गजानन कदम यांच्यासह गोपाळ समाजातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Previous Post

किनवट रेल्वे स्टेशनचे काम उत्कृष्ट; मात्र अंडरब्रिजच्या निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त

Next Post

एक हजार रुपयांची लाच घेताना विद्युत कर्मचारी जाळ्यात

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post

एक हजार रुपयांची लाच घेताना विद्युत कर्मचारी जाळ्यात

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In