• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डिझेल टंचाईमुळे शेतीची कामे ठप्प; शेतकऱ्यांमध्ये संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. नांगरणी, रोटावेटर, पेरणीपूर्व मशागत, पाईपलाईन टाकणे यांसारखी महत्त्वाची कामे रखडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारे डिझेलअभावी जागच्या जागी उभी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

दरवर्षी याच काळात शेतात मशागतीची लगबग सुरू असते. मात्र यंदा डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने ट्रॅक्टर चालक आणि जेसीबी चालकांनीही हात टेकले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. वेळेत मशागत आणि नांगरणी न झाल्यास आगामी हंगाम उशिरा सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जागतिक परिस्थिती आणि युद्धजन्य कारणांमुळे इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. “खरेदी महाग आणि विक्री स्वस्त का?” असा सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डिझेल, खते, खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे दर वाढतात; मात्र कापूस, सोयाबीन, भाजीपाला अशा शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे डिझेल टंचाई हा केवळ इंधनपुरवठ्याचा प्रश्न नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागात डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous Post

पाण्यापासून रस्त्यांपर्यंत आजरेकरांचा संघर्ष कायम; हक्काच्या लोकप्रतिनिधीअभावी जनता वाऱ्यावर

Next Post

रिसोडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हाहाकार; २० जणांना चावा, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
48
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post

रिसोडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हाहाकार; २० जणांना चावा, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In