• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हाहाकार; २० जणांना चावा, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी

रिसोड शहरात गुरुवारी सकाळपासून पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल २० नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. जखमींवर ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे उपचार सुरू असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणी फाटा परिसर, रामनगर, आठवडी बाजार, चांदणी चौक तसेच अष्टभुजा गणेश मंदिर परिसरात या कुत्र्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले सुरू केले. लहान मुले, बाजारासाठी गेलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला या कुत्र्याने लक्ष्य केले.

नागरिकांनी आरडाओरड करत तसेच दगड मारून कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत अनेकजण जखमी झाले होते. ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने उपचार आणि रेबीज लसीकरणासाठी धावपळ उडाली.

मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मटन मार्केट परिसरातील घाण, कचरा, हॉटेलमधील उष्टे अन्न आणि मोकळे भूखंड यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रेबीज लसीकरण आणि आवश्यकतेनुसार त्यांना शेल्टरमध्ये हलवण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस मोहीम राबवली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांची तीव्र मागणी

नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला तातडीने पकडून निरीक्षणाखाली ठेवावे, शहरातील मोकाट कुत्र्यांची श्वानगणना करून निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहीम राबवावी, तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Previous Post

डिझेल टंचाईमुळे शेतीची कामे ठप्प; शेतकऱ्यांमध्ये संताप

Next Post

शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In