• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 21 (का.प्र.) :
राज्यातील सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांनी पदोन्नती प्रक्रियेतील कथित अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, “सिनियारिटी कम मेरीट” (सेवाजेष्ठता व गुणवत्ता) या तत्त्वानुसारच पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण सिनिअर शिक्षक कृती समितीने शासनाला दिला आहे.

सध्या सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेत सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात नसलेल्या १ सप्टेंबर २०२५ च्या कथित शासन निर्णयाचा आधार घेत पदोन्नती प्रक्रिया राबवली जात असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून प्रशासन मनमानी करत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एसएलपी (SLP) प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. “सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया राबविणे म्हणजे सेवाजेष्ठ शिक्षकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे,” असे समितीने स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीपीसी बैठकीच्या तारखेला जे शिक्षक टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण असतील त्यांना पदोन्नतीस पात्र मानणे आवश्यक असताना, कृत्रिम कटऑफ तारीख लावून पात्र शिक्षकांना डावलले जात असल्याचा दावा समितीने केला आहे. “०१/०९/२०२५ ही तारीख कोणत्या शासन निर्णयात नमूद आहे?” असा सवालही समितीने उपस्थित केला.

विशेष म्हणजे अनेक सेवाजेष्ठ शिक्षकांनी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्या. मात्र आता त्यांनाच पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती देण्याचा घाट घातला जात असेल, तर तो सहन केला जाणार नाही,” असा इशारा कृती समितीने दिला आहे.

१ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती समितीच्या बैठका सप्टेंबरपूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या विलंबामुळे सेवाजेष्ठ शिक्षकांचे नुकसान होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच या शासन निर्णयाची अंमलबजावणी २०१९ ते २०२५ अखेरपर्यंत का झाली नाही? आणि आत्ताच नव्याने हा नियम लागू करण्याची गरज काय भासली? असा प्रश्न उपस्थित करत, सध्याच्या डीपीसी बैठकीच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपर्यंत पात्र ठरलेल्या शिक्षकांचा विचार करणेच न्याय्य ठरेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा सेवा प्रवेश नियम १९६७ मधील नियम ६(४) चा दाखला देत “सिनियारिटी कम मेरीट” हेच पदोन्नतीचे वैध तत्त्व असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या मागणीसाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे समितीने सांगितले. तसेच या विषयावर पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी २३ मे रोजी पुणे येथे शिक्षण संचालकांची भेट घेतली जाणार आहे.

या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांना जिल्ह्यातील सेवाजेष्ठ टीईटी पात्र शिक्षक महेंद्र बैसाणे, सुनील चव्हाण, संतोष कुवर, गोकुळदास बेडसे, दिलीप ईशी, प्रवीण पाटील, सुनील बोरसे आदींनी निवेदन दिले.

राज्यातील हजारो सेवाजेष्ठ शिक्षकांच्या न्यायाच्या लढ्याला आता निर्णायक वळण लागण्याची चिन्हे दिसत असून, शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट न केल्यास हा प्रश्न आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
7
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
65
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In