• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा शहरातील खड्डे तात्काळ बुजवा; अन्यथा शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शहादा | दि. २१ | खास प्रतिनिधी

शहादा शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहादा तालुकाप्रमुख मनलेश ए. जायसवाल यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी शहादा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहादा नगरपालिकेच्या हद्दीतील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. परिणामी वाहनधारकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शहादा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सुमारे २०० गावांतील नागरिक दररोज बाजारपेठेसाठी शहरात येत असतात. मात्र खराब रस्त्यांमुळे व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, स्थानिक व्यापारावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

“शहरातील एखादा-दुसरा रस्ता वगळता बहुतांश रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही पालिका प्रशासन आणि पदाधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप शिवसेनेने केला आहे.

पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनावर तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्यासह शिवसेना ज्येष्ठ नेते राजेंद्र पेंढारकर, जयसिंग ठाकरे, गोपाल कोळी, हितेंद्र वर्मा, जगदीश पाटील, ॲड. लव लोहार, अंकुश लोहार आणि महेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी नंदुरबार, नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

रिसोडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हाहाकार; २० जणांना चावा, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Next Post

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
5
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
65
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In