• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी दीपकभाई पटेल यांची नियुक्ती
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २१ :
नंदुरबार जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शहादा येथील ‘पटेल रेसिडेन्सी ग्रुप’चे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते दीपकभाई रमणलाल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदावर अखेर नियुक्ती जाहीर झाल्याने जिल्हा काँग्रेसला नवे नेतृत्व मिळाले असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्यभर संघटनात्मक फेरबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांनी नुकताच नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना जाणून घेतल्या होत्या.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

या महत्त्वाच्या पदासाठी जिल्ह्यातील सुमारे २० हून अधिक इच्छुकांनी दावेदारी केली होती. मात्र पक्षातील ज्येष्ठता, प्रदीर्घ राजकीय अनुभव, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा या निकषांवर पक्षश्रेष्ठींनी दीपकभाई पटेल यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले.

दीपकभाई पटेल यांनी यापूर्वी शहादा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकीय, सामाजिक, व्यावसायिक तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क आणि सलोख्याचे संबंध असल्याने आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हाभरातून विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावरही शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

सेवाजेष्ठ टीईटी/सीटीईटी शिक्षकांचा पदोन्नतीसाठी कृती समितीचा इशारा

Next Post

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
5
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
65
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In