• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रत्येक गावात शासकीय योजनांची माहिती पोहोचवा : सुधीर देसाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

आजरा कृषी विभागाच्या आढावा बैठकीत सूचना; विविध विषयांवर चर्चा

आजरा : प्रतिनिधी

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केली. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी समन्वय साधून आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा आणि त्या दिवशी गावात उपस्थित राहून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

आजरा तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे, पंचायत समिती सभापती जयश्री गाडे आणि उपसभापती यशोदा पोवार उपस्थित होत्या.

तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीत जालिंदर पांगरे यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवरील विविध कृषी योजना आणि अनुदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीत खरीप हंगामाचे नियोजन, बी-बियाणे व खतांचा पुरवठा तसेच बांबू लागवड प्रस्ताव या विषयांवर चर्चा झाली. युवराज पोवार यांनी प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती मागितली.

शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी, अशी मागणी हरीश कांबळे यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय देसाई यांनी वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत असल्याचे सांगत नुकसानभरपाई वाढवण्याची मागणी केली. काशीनाथ मोरे यांनीही यावर आपले मत व्यक्त केले.

कल्पेवाडी बाग, नारायण बाग आणि कृषी चिकित्सालयाच्या जमिनी भांडवलदारांना देऊ नयेत, अशी मागणी दिनेश कांबळे यांनी केली. तर ‘घनसाळ’ तांदळाचा दर्जा टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, अशी मागणी समीर चांद यांनी केली.

बैठकीच्या शेवटी जिल्हा तंत्र अधिकारी युकेश्वर गोठणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.

या बैठकीस कृषी अधिकारी दीपक मुळे, विजयसिंह दळवी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल यमगेकर, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपसभापती यशोदा पोवार यांनी आभार मानले.

Previous Post

सोशल मीडियावर ‘कॉकरोज जनता पार्टी’चा झंझावात; तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद

Next Post

हरकूळ विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post
हरकूळ विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

हरकूळ विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In