• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरकूळ विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
हरकूळ विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता पावसकर यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

कणकवली : प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल हरकूळ बु. येथील शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हरकूळ बु. विभागप्रमुखपदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड करण्यात आली.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

या प्रसंगी वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन ओमप्रकाश ताम्हाणेकर यांचे अभिनंदन केले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि विधी सेवा समिती सदस्य श्वेता पावसकर यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात विविध हायस्कूलमधील दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या हरकूळ गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना वैभव नाईक म्हणाले, “शिवसेना पक्षाने नेहमीच सामान्य शिवसैनिकांना मोठ्या पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक आमदार, खासदार आणि नगरसेवक पदापर्यंत पोहोचले आहेत. संघटना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये राहून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.”

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, “बदलत्या राजकीय परिस्थितीत हरकूळ गावात शिवसेना टिकवणे आव्हानात्मक होते, मात्र शिवसैनिकांनी एकजुटीने ते शक्य करून दाखवले. लवकरच रिक्त पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.”

नगरसेविका श्वेता पावसकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मी एक सामान्य शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी देऊन निवडून आणले. मुंबईत काम करताना हरकूळ गावातील शिवसैनिकांच्या पाठीशी कायम उभी राहीन.”

या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक संकेत नाईक, विधानसभा प्रमुख राजेश पावसकर, ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर पारकर, फैयाज खान, मोहन तांबे, आनंद महाडेश्वर, पांडुरंग पारकर, श्रीधर चव्हाण, नासिर पटेल, लक्ष्मण खोचरे, शंकर परब, गणेश चव्हाण, महेश मोरये, अनिल जुवेकर, अंकुश परब, साक्षी खोचरे, सौ. कांदळकर, अशोक जुवेकर यांच्यासह शिवसैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

प्रत्येक गावात शासकीय योजनांची माहिती पोहोचवा : सुधीर देसाई

Next Post

युवा शक्तीचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांविरोधात अकलूजमध्ये युवासेनेचे तीव्र आंदोलन

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post

युवा शक्तीचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांविरोधात अकलूजमध्ये युवासेनेचे तीव्र आंदोलन

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In