• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

“धार्मिक सलोखा व एकात्मतेची भावना जपत बकरी ईद साजरी करावी”
— जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

परभणी | प्रतिनिधी :

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. नागरिकांनी धार्मिक सलोखा, शांतता आणि एकात्मतेची भावना जपत बकरी ईद उत्साहात साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

बैठकीस पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच शांतता समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

बकरी ईदच्या शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, सणांच्या काळात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. बकरी ईदनिमित्त जनावरांची कुर्बानी दिली जाते. मात्र, जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर संबंधितांनी कठोर कारवाई करावी. तसेच कचरा रस्त्यावर पडणार नाही आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा लागू असून कोणीही गोवंश हत्या करू नये. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहरी तसेच ग्रामीण भागात शांतता अबाधित राहावी यासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. सोशल मीडियावर वादग्रस्त संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित करून वातावरण बिघडविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत म्हणाले की, बकरी ईद शांततेत आणि उत्साहात साजरी व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. ईदनिमित्त नमाजासाठी मोठ्या संख्येने नागरिक ईदगाह मैदानावर येत असल्याने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे संदेश किंवा व्हिडिओ कोणत्याही समाज माध्यमांवर प्रसारित करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ 112 या क्रमांकावर पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही कायदा हातात घेऊ नये, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करावा तसेच परवानगी असलेल्या जनावरांचेच बलिदान द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

बकरी ईद सण सुरळीत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी महानगरपालिकेने आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. यावेळी शांतता समिती सदस्यांनी विविध सूचना प्रशासनाकडे मांडल्या.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

‘दुष्काळातही झाडांना जीवदान देणारे’ गंगाखेडचे गोपी मुंडे; सीमा मुंडे यांच्यासह वृक्षसंवर्धनाचा घेतला वसा

Next Post

त्रिमूर्ती नगरामध्ये विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
89
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
34
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post

त्रिमूर्ती नगरामध्ये विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In