• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘दुष्काळातही झाडांना जीवदान देणारे’ गंगाखेडचे गोपी मुंडे; सीमा मुंडे यांच्यासह वृक्षसंवर्धनाचा घेतला वसा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘दुष्काळातही झाडांना जीवदान देणारे’ गंगाखेडचे गोपी मुंडे; सीमा मुंडे यांच्यासह वृक्षसंवर्धनाचा घेतला वसा
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना, गंगाखेड शहरातील कापसे गल्ली येथील गोपी मुंडे आणि सीमा मुंडे हे दाम्पत्य वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण करत आहेत. दुष्काळी परिस्थितीतही झाडांना जीवदान देत त्यांनी वृक्षप्रेमाची अनोखी चळवळ उभी केली आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी त्यांनी रस्त्यालगत विविध छायादार व उपयुक्त वृक्षांची लागवड केली होती. सुरुवातीला अनेकांनी “ही झाडं जगणार नाहीत”, “मोठी होणार नाहीत” अशी शंका व्यक्त केली. मात्र गोपी मुंडे यांनी न डगमगता झाडांचे नियमित संगोपन सुरू ठेवले. पाणी देणे, झाडांना आधार देणे, संरक्षणासाठी जाळ्या बसवणे आणि उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे अशी सर्व कामे त्यांनी स्वतःहून केली.

वृक्षारोपणावेळी काही वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र त्यानंतर झाडांच्या देखभालीची जबाबदारी गोपी मुंडे आणि सीमा मुंडे यांनीच खांद्यावर घेतली. पुरस्थिती असो किंवा तीव्र उन्हाळा, त्यांनी झाडांची निगा राखण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

गोपी मुंडे म्हणाले, “जशी आपण लहान मुलं वाढवतो, तशीच आम्ही या झाडांना वाढवलं आहे. झाडे सावली देतात, प्राणवायू देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करायला हवे.”

ते पुढे म्हणाले, “ही झाडं फक्त आमची नाहीत, ती संपूर्ण समाजाची आहेत. उद्या कुणाला या झाडाखाली सावली मिळेल, कुणाला शुद्ध हवा मिळेल. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनानेही वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा.”

दरवर्षी नवीन रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्यांच्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी दिलेला संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

जगाच्या पाठीवर भारतीय नाट्यपरंपरा अतिशय समृद्ध : डॉ. योगिता महाजन

Next Post

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
91
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In