• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

त्रिमूर्ती नगरामध्ये विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

मानवत | प्रतिनिधी :

मानवत शहरातील पाळोदी रोड परिसरातील त्रिमूर्ती नगरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे ६० ते ७० घरांची वस्ती असलेल्या या भागात अद्यापही सिंगल फेज वीज पुरवठा सुरू असल्यामुळे कमी दाबाचा वीज प्रवाह, सतत लाईट जाणे आणि तासन्तास अंधाराचे वातावरण निर्माण होत आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

नगरपालिकेचे पाणीपुरवठा सुरू होताच वीज खंडित होणे हे येथील नागरिकांसाठी नित्याचे झाले आहे. नियमितपणे वीज बिल भरूनही महावितरणकडून समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरातील वीज वसुली जवळपास १०० टक्के असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक वीज जाण्याच्या प्रकारामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कमी-जास्त व्होल्टेजमुळे घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित वीज वितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्या, मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्रिमूर्ती नगरासाठी तातडीने थ्री फेज वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी आणि वारंवार होणारे वीज खंडित प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

Next Post

जुन्नर येथे लोककलावंतांचे गजर आंदोलन संपन्न; मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महागजर आंदोलन’चा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
18
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
88
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
26
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
जुन्नर येथे लोककलावंतांचे गजर आंदोलन संपन्न; मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महागजर आंदोलन’चा इशारा

जुन्नर येथे लोककलावंतांचे गजर आंदोलन संपन्न; मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महागजर आंदोलन’चा इशारा

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In