श्रीगोंदा : प्रतिनिधी
साखर उद्योगातील आघाडीचा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर तेजस्विनी बर्गे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तेजस्विनी बर्गे यांनी आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापकीय कौशल्याने, कार्यक्षमतेने आणि सातत्यपूर्ण परिश्रमातून उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत ओंकार समूहाने त्यांच्यावर CEO पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल साखर उद्योग क्षेत्रातून तसेच मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी बाबूराव बोत्रे-पाटील आणि ओमराजे बोत्रे यांनी तेजस्विनी बर्गे यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शुगर ग्रुप प्रगतीची नवी शिखरे गाठेल तसेच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी ओंकार समूहातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी तेजस्विनी बर्गे यांचे अभिनंदन करून त्यांच्या नव्या जबाबदारीच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









