• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर ‘ग्रामदैवत विकास पॅनल’ विजयी

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बहुप्रतीक्षित आणि चुरशीच्या निवडणुकीत शरद जमदाडे व उत्तम राऊत यांच्या नेतृत्वाखालील ‘ग्रामदैवत विकास पॅनल’ने ऐतिहासिक विजय मिळवला. पॅनलने २५ पैकी तब्बल २५ जागांवर विजय मिळवत विरोधी पॅनलचा धुव्वा उडविला. विजयी उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारल्याने ग्रामदैवत विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या निवडणुकीत एकूण ५ हजार ५० मतदार होते. त्यापैकी ३ हजार ७६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच सुमारे ७५ टक्के विक्रमी मतदान झाले. मतमोजणीत २२८ मते बाद ठरली.

तिरंगी लढतीत ग्रामदैवत विकास पॅनलचा विजय

निवडणुकीत तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. शरद जमदाडे व उत्तम राऊत यांच्या नेतृत्वाखालील ग्रामदैवत विकास पॅनल, शिवप्रसाद उबाळे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामदैवत सेवा पॅनल आणि महेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामदैवत नवक्रांती पॅनल यांच्यात सामना रंगला.

मात्र निकालात ग्रामदैवत विकास पॅनलने सर्व २५ जागांवर विजय मिळवत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले.

रात्रभर मतमोजणी; सकाळी सात वाजता विजयी घोषणा

रविवारी सकाळी उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या मतमोजणीमुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक कायम होती. तब्बल १२ तासांच्या मतमोजणीनंतर सोमवारी सकाळी सात वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्रामदैवत विकास पॅनलच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.

निकालानंतर आढळगावात जल्लोष

निकाल जाहीर होताच आढळगावात ग्रामदैवत विकास पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला.

श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टची ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिली. देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीत एवढी मोठी आणि चुरशीची लढत झाल्याने परिसरात या निकालाची विशेष चर्चा सुरू आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

Next Post

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
7

3

4
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
देवणीत दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसचा न्याय मोर्चा
ताज्या घडामोडी

देवणीत दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसचा न्याय मोर्चा

October 5, 2026
14
Next Post
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In