• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोविंद पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा : गौरव कृष्ण गोस्वामीजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
गोविंद पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा : गौरव कृष्ण गोस्वामीजी
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

श्रीमद् भागवत कथा : चौथ्या पुष्पात भक्तीचा आनंद

जालना (प्रतिनिधी): मोठे पद, प्रतिष्ठा , वैभव,उंची गाठली की जबाबदारी वाढते .समाजाची दृष्टी आपल्यावर असते .आपल्या हातून अनुचित कृत्य घडल्यास समाज निंदा करतो आणि प्रभाव असेल तर आपल्या चुकीचही अनुकरण करतो . मोठ्या व्यक्तींनी जवाबदारीने कर्तव्याचे पालन करावे. प्रत्येकाच्या कर्माची नोंद भगवंताकडे असून आपण आपल्या हातून झालेल्या चुका ,पाप , अपराध मान्य केल्यास अर्धे पाप नष्ट होते. भगवंत पाहत असल्याचे भान ठेवून कर्म करा असा मौलिक हितोपदेश आचार्य परमपूज्य गौरव कृष्ण गोस्वामीजींनी दिला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने वेदमाता गायत्री मंदिर परिसरातील वृंदावन धाम येथे परमपूज्य गौरव कृष्ण गोस्वामीजी यांनी‌ अमृतमय वाणीतून आयोजित श्रीमद् भागवत कथेत शनिवारी ( ता .23) चौथ्या पुष्पात” कपिल देवहुती संवाद , ध्रुव चरित्र”यावर विवेचन केले.प्रारंभी मुख्य यजमान गोपाल गोयल , समितीचे अध्यक्ष घनश्यामदास गोयल,हरे कृष्णा सत्संग समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, जगदीश राठी कांतीलाल राठी,यांच्या हस्ते व्यासपीठ पूजन,आरती करण्यात आली.

आचार्य गौरव कृष्ण गोस्वामीजी यांनी गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास नव्हे तर सर्व जीवांसाठी सांगितलेली कथा मनाचा रस्ता बदलते. ज्यांना मार्ग दिसत नाही त्यांच्यासाठी कथा ही मार्गदर्शक असून कथा श्रवण करतांना विद्वान म्हणून नव्हे तर श्रोता म्हणूनच ग्रहण करावी .जन्मत: मनुष्याला शरीर,परिवार आणि धन प्राप्त होते. स्मशानात हे सगळे सोडून जावे लागते. असे सांगून जीवनाची परम शांती ही प्रभूच्या चरणात असून मृत्यू समयी केवळ भगवंताचीच चर्चा केली पाहिजेत, काळ ,वेळ न पाहता संसारिक जबाबदारी, कर्तव्य पार पाडून गोविंदाशी नाते जोडा, भक्ती योगातूनच खरे कल्याण साध्य होते . असे जीवनाचे सार गौरवकृष्ण गोस्वामीजीनी विषद केले.
जय ,,जय ,,गोविंद, गोविंद ,,गोपाल हरी ,,,भजमन गोविंद गोपाल हरी,,, श्याम प्यारे से जिसका संबंध है, उसको हर घडी, आनंद ही आनंद है…! अशा संगीतमय नामसंकीर्तन आणि भक्ती गीतांवर भाविकांनी ठेका धरत भक्ती रसाचा आनंद लुटला.
शेवटी मुख्य यजमान, दैनिक यजमान गोपाल मानधनी,सागर अग्रवाल यांच्यासह मेघराज चौधरी, प्रसन्ना जाफराबादकर, यशवंत बदनापूरकर, महेश भक्कड,शरद जैस्वाल, हिरालाल पिपरीये,जिजाभाऊ खांडेभराड, शिवनाथ खेडेकर, नारायण दायमा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
कथास्थळी सामुदायिक भगवद्गीता ग्रुप जुना जालनाच्या वतीने 40 महिलांनी गीता पाठ घेतला. तसेच रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी,चहा, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी उपमहापौर राजेश राऊत,समितीचे महासचिव सुभाषचंद्र देविदान, अंकुशराव राऊत, वामनराव राऊत,अभय कुलकर्णी, दामोधर बजाज, नरेंद्र मोदी,संघटनमंत्री मनीष तवरावाला,सुशील पाण्डेय, योगेश ठक्कर,पवन जोशी, रामेश्वर जोशी, पुरुषोत्तम मोतीवाला, गोवर्धन अग्रवाल ,सुदेश करवा,नरेश गुप्ता, सुशील खंडेलवाल, रामनिवास गौड, जयप्रकाश श्रीमाळी , सुनील बियाणी,डुंगरसिंह राजपुरोहित,अरुण मित्तल,अमोल बांगड,मनोज पाचफुले, विजय दाड,रामकुंवर अग्रवाल, सुरेंद्र चेचाणी, राजेंद्र राठी, गणेश अग्रवाल, जगदीश प्र.भरतिया, डॉ.मोहन शिंदे,धनराज काबलीये, नरेश केलानी, सुनील भुतिया, रोहित भुरेवाल, भगवान दायमा ,मनोज दायमा, ताराचंद शर्मा, निलेश खंडेलवाल,डॉ. सुदर्शन काळे, गौरव बोरा, दीपक मोदी, रोहित नलावडे, कैलास चंदभनानी, यांच्यासह महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चौकट
आज श्रीकृष्ण जन्म,नंदोत्सव…!
श्रीमद् भागवत कथा सोहळ्यात रविवारी ( ता.24) प्रल्हाद चरित्र,वामन अवतार, श्रीकृष्ण जन्म, तुफान जल्लोषात नंदोत्सव साजरा केला जाणार असून भाविकांनी पिवळे वस्त्र परिधान करून यावे आणि मोठ्या संख्येने
कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

आष्टी आणि कोकाटे हादगाव सर्कलमध्ये वादळाचे थैमान

Next Post

बोगस रस्ता कामांचे मस्टर बंद करून घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ काढावेत; मनसेची मागणी

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
8
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
16
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
222
Next Post
बोगस रस्ता कामांचे मस्टर बंद करून घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ काढावेत; मनसेची मागणी

बोगस रस्ता कामांचे मस्टर बंद करून घरकुल लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ काढावेत; मनसेची मागणी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In