• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धोंदलगाव येथे डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड; खरीप हंगामावर संकटाची छाया

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
धोंदलगाव येथे डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड; खरीप हंगामावर संकटाची छाया
0
SHARES
95
VIEWS
Ad 1
Ad 1

धोंदलगाव, ता. वैजापूर| प्रतिनिधी

खरीप हंगाम तोंडावर आला असताना धोंदलगाव परिसरातील शेतकरी डिझेल टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. शेती मशागतीच्या कामांना वेग आला असतानाच येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली असून ट्रॅक्टर, टेम्पो, जीप आणि इतर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

विशेष म्हणजे अनेक शेतकरी डिझेल साठवण्यासाठी रंगीबेरंगी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर सकाळपासूनच थांबलेले दिसत आहेत. भर उन्हात आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत शेतकरी तासनतास उभे राहत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या नांगरणी, रोटाव्हेटर, पेरणीपूर्व मशागत आणि पाणीपुरवठ्यासाठी ट्रॅक्टर व डिझेल पंपांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मात्र अचानक निर्माण झालेल्या डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. “वेळेत डिझेल मिळाले नाही तर पेरणीची कामे रखडतील आणि खरीप हंगाम धोक्यात येईल,” अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

काही ठिकाणी डिझेल कॅनमध्ये देण्यास नकार दिला जात असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतातील स्थिर पंप किंवा मशागतीची यंत्रे पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसल्याने अनेकांची अडचण वाढली आहे.

दरम्यान, इंधन टंचाईबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पंपांवर मोठ्या रांगा दिसत आहेत.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून खरीप हंगाम लक्षात घेता ग्रामीण भागासाठी स्वतंत्र नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Nana Sable
Previous Post

शरद दिवे : विक्रमगड-पालघर परिसरातील सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

Next Post

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In