• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

कोपरगाव प्रतिनिधी –

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव हद्दीतील हाळनोरवस्ती येथे काल झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करत उन्हापासून संरक्षण व दर्जेदार उत्पादनासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभारून डाळिंब बागांवर क्रॉप कव्हर बसवले होते. मात्र अचानक आलेल्या वादळामुळे काही क्षणातच अनेक महिन्यांचे परिश्रम व लाखो रुपयांची गुंतवणूक उद्ध्वस्त झाली.

वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागांवरील संपूर्ण क्रॉप कव्हर उडून गेले असून लोखंडी पोल मोठ्या प्रमाणात वाकले आहेत. तसेच झाडांवरील तयार डाळिंब फळे खाली पडल्याने उत्पादनाचेही मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार एका शेतकऱ्याचेच सुमारे साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो १७० ते १८० रुपये दर मिळत असताना, हाता-तोंडाशी आलेले उत्पन्न निसर्गाच्या प्रकोपामुळे हिरावले गेल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून अद्याप सुरू झाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. तर महसूल विभागाशी संपर्क साधला असता या घटनेबाबत अनभिज्ञता असल्याचे समोर आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Ad 1
Previous Post

“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”

Next Post

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In