• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

महाराष्ट्र शासनाने पनवेलच्या गुन्हेगारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज..

पनवेल | प्रतिनिधी:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ-३ च्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदाचा कार्यभार रश्मी नांदेडकर यांनी नुकताच स्वीकारला. महिला पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची वर्णी लागल्याने कायदा-सुव्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा असतानाच, त्यांनी पदभार स्वीकारताच पनवेल शहरात खुनाचे सत्र सुरू झाले आहे. या ताज्या हत्येच्या घटनेने जणू डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे पनवेलमध्ये ‘रक्ताळलेले स्वागत’ झाले असून, शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

परिमंडळ-३ परिसरात विविध ठिकाणी गुन्हेगार आणि त्यांच्या बगलबच्चांनी मोठा हैदोस घातला आहे. अवैध धंदे करणाऱ्या टोळ्या आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचे मोठे आव्हान नवनियुक्त डीसीपी नांदेडकर यांच्यासमोर उभे ठाकले आहे. या ताज्या हत्येचा उलगडा करणे आणि फरार आरोपींचा शोध घेणे हे त्यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान आहे. आता डीसीपी नांदेडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कशा प्रकारे सूचना देतात आणि फरार आरोपींना तात्काळ गजाआड कसे करतात, याकडे सर्व पनवेलकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

पनवेल शहर हे भौगोलिक आणि गुन्हेगारीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील बनत चालले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता जुनाट पद्धती सोडून संवेदनशील भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवणे, गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर अचानक धाडी टाकून कोम्बिंग ऑपरेशन राबवणे,हद्दपार (तडीपार) केलेल्या गुन्हेगारांवर कडक पाळत ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दामिनी पथक अधिक सक्रिय करणे अशा प्रकारचे उपाययोजना तातडीने राबवणे काळाची गरज बनली आहे.

पनवेल शहरातील ही चौथी हत्या असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती आणि संताप आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या गुन्हेगारीकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदासाठी कोणत्याही राजकीय शिफारसीचा विचार न करता, तसेच नवी मुंबईत यापूर्वी काम न केलेला निष्कलंक अधिकारी द्यावा, अशी मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून पनवेलला एक कडक शिस्तीचा, ‘दबंग’ पोलीस अधिकारी द्यावा, जेणेकरून पनवेल शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील.

Ad 1
Previous Post

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

Next Post

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
232
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In