• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी –

पाथरी तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, ऊस, पपई, आंबा तसेच इतर फळपिकांना मोठा फटका बसला असून अनेक एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तालुक्यातील कासापुरी, पाथरगव्हाण खुर्द, बाबुलतार, जेतापूरवाडी, वरखेड आणि हादगाव बु. या भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा बसला. अनेक ठिकाणी केळीच्या बागा उन्मळून पडल्या असून पपई व आंब्यांच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार भरत गंगावणे यांनी नुकसानग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत. सर्व तलाठ्यांना संबंधित गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करून सोमवारी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, कासापुरी येथे ३३ शेतकरी बाधित होऊन सुमारे २४ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले आहे. पाथरगव्हाण खुर्द येथे २४ शेतकऱ्यांच्या १८ हेक्टर क्षेत्रावरील केळी व आंबा बागांचे नुकसान झाले आहे. बाबुलतारा येथे ५ हेक्टरवरील केळी व ४ हेक्टरवरील पपई पिकांचे नुकसान झाले आहे. जेतापूरवाडी येथे ४ हेक्टरवरील केळी तसेच इतर फळपिकांचे सुमारे ५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. वरखेड येथे २५ शेतकऱ्यांच्या १७ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले असून हादगाव बु. येथे पाच घरांचेही नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आली आहे. तसेच सुमारे २५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकालाही मोठा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. वाढते उत्पादन खर्च, पाण्याची टंचाई आणि बाजारभावातील अस्थिरता यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता या अवकाळी संकटामुळे दुहेरी आर्थिक भार पडला आहे.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यानंतर बाधित क्षेत्र व शेतकऱ्यांची अंतिम संख्या निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

“पाथरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे काही भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
— राजेश विटेकर, आमदार

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

पनवेल शहरात हत्येच्या घटनेने डीसीपी रश्मी नांदेडकर यांचे स्वागत; कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा!

Next Post

केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार

केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In