• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
केज नैसर्गिक आपत्ती: आ. नमिता मुंदडा यांच्या सूचनेनंतर ९० टक्के पंचनामे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी करणार
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

अंबाजोगाई: शनिवारी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास केज तालुक्यात प्रचंड उकाड्यानंतर अचानक आलेल्या भयानक वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीत युसुफवडगाव आणि आडस कृषी मंडळातील युसुफवडगाव, सोनिजवळा, धनेगाव, भालगाव, बावची, साळेगाव, माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, सुकळी, गोटेगाव, मोटेगाव, बोबडेवाडी, आनेगाव, नायगाव, आवसगाव यांसह अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे शेतकऱ्यांच्या केळी आणि पपईच्या बागा उन्मळून पडल्या असून, काढणीला आलेल्या आंब्याचा खच पडला आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून विजेचे खांब आणि रोहित्र कोसळल्याने संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या कोपामुळे हिरावला गेल्याने तालुक्यात अत्यंत चिंताजनक आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करत स्वतः बचाव आणि मदतकार्याची सूत्रे हाती घेतली. आमदार नमिता मुंदडा यांनी केजचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना तातडीने बाधित गावांचा दौरा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे कडक निर्देश दिले होते. आमदार मुंदडा यांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळपासूनच बाधित परिसरात दाखल होत युद्धपातळीवर पंचनामे सुरू केले असून, दिवसभरात जवळपास ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेती पिके, फळबागा, घरे आणि वीज यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून बाधित नागरिकांना व शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार मुंदडा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासनाने या कामात कोणताही हलगर्जीपणा करू नये, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या आहेत.

नुकसानग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी सविस्तर चर्चा करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याबाबत पावले उचलली आहेत. या गंभीर संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आमदार नमिता मुंदडा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. या भेटीत त्या तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीची संपूर्ण माहिती देऊन केजमधील वादळग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष पॅकेज व तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्याची आग्रही विनंती करणार आहेत.

Ad 1
Previous Post

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने पाथरी तालुक्यातील फळपिकांचे मोठे नुकसान; महसूल विभागाकडून पंचनामे सुरू

Next Post

गागोदे खुर्द गावात चावऱ्या कुत्र्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांचा मोठा त्रास, अखेर नागरिकांनी घेतली खबरदारीची भूमिका

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
232
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
गागोदे खुर्द गावात चावऱ्या कुत्र्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांचा मोठा त्रास, अखेर नागरिकांनी घेतली खबरदारीची भूमिका

गागोदे खुर्द गावात चावऱ्या कुत्र्याचा धुमाकूळ; ग्रामस्थांचा मोठा त्रास, अखेर नागरिकांनी घेतली खबरदारीची भूमिका

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In