• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल| प्रतिनिधी:
पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांच्या निषेधार्थ आज पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे वाहतूक सेनेच्या वतीने एक अत्यंत अनोखे आणि उपरोधिक आंदोलन करण्यात आले. वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन जाधव यांनी थेट ‘चित्रगुप्त’ रूप धारण करत या आगळ्यावेगळ्या आंदोलनाचे नेतृत्व केले. पनवेलमधील एका पेट्रोल पंपावर सोमवारी हे आंदोलन पार पडले.

या अनोख्या आंदोलनादरम्यान चक्क ‘चित्रगुप्त’ प्रकट झाले होते, जे या आंदोलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. चित्रगुप्तांच्या वेशातील व्यक्तीने, केंद्र सरकार करत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेची होणारी लूट आणि हाल यांची नोंद आपल्या चोपड्यामध्ये (हिशोबाच्या वहीत) केल्याचे दाखवले

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

‘मेलोडी खा, खुश राहा’ म्हणत सरकारवर निशाणा साधण्यात आला या आंदोलना दरम्यान पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना “मेलोडी” चॉकलेटचे वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर उपरोधिक भाष्य करताना आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना सांगितले की, “सरकार महागाई कमी करत नसेल, तर निदान मेलोडी खा… सर्व व्यथा थोड्या वेळासाठी का होईना दूर होतील! खुश राहा… कारण पेट्रोल-डिझेलचे दर मात्र थांबायचे नाव घेत नाहीत!” या उपरोधिक संदेशाद्वारे मनसैनिकांनी सर्वसामान्य जनतेच्या मनातील तीव्र संताप आणि भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्येही मोठी वाढ होत आहे. यामुळे घर चालवणे अत्यंत कठीण झाले असून, महागाईचा भडका उडाल्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेने महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थितीया अनोख्या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर, वाहतूक सेना जिल्हा संघटक सचिन जाधव (चित्रगुप्त), जिल्हा सचिव स्नेहल बागल, पनवेल महानगर सचिव पराग बालड, पनवेल उप तालुका अध्यक्ष दीपेश जी पोपेटा आणि वाहतूक सेना जिल्हा संघटक दशरथ मुंडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच पनवेल महानगर महिला अध्यक्ष स्वरूपा सुर्वे, पनवेल उपशहर अध्यक्ष रोहन पाटील, विधानसभा संघटिका पूजा मोहन, वाहतूक सेना उपाध्यक्ष पूनम जयस्वाल, आशिता पाटील, क्रांती सारंग,मनिषा देशमुख, सिद्धेश पावले, गिरीश तिवारी यांच्यासह मनसे व वाहतूक सेनेचे इतर आक्रमक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या पनवेल शहरात मनसेच्या या ‘चित्रगुप्त’ आंदोलनाची आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

Next Post

अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In