• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
अमली पदार्थांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

जिल्हाभर कठोर कारवाईची मागणी; अन्यथा विद्यार्थी-पालकांचा विराट मोर्चा

इंदापूर | प्रतिनिधी
राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या विक्रीमुळे तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाभरात सुरू असलेल्या अवैध अमली पदार्थ विक्रीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास विद्यार्थी, पालक, शेतकरी आणि नागरिकांचा विराट मोर्चा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश (तात्या) बालवडकर, बाबासाहेब झगडे तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष सुखदेव जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यासारख्या शिक्षणनगरी जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थी, तरुण आणि समाजव्यवस्थेवर होत आहे. खून, चोरी, दरोडे, अपहरण, गँगवॉर आणि युवकांमधील वाढते वाद यामागे अमली पदार्थांचे वाढते सेवन हे गंभीर कारण ठरत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

“शहरासह ग्रामीण भागात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांची माहिती स्थानिक यंत्रणांना असूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे,” असा आरोप संघटनेने केला. तसेच या अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकरी संघटनेने पोलिस प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रीचे संपूर्ण उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शेतकरी व नागरिकांचा मोठा मोर्चा जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

“आज अमली पदार्थांवर कठोर कारवाई झाली नाही, तर उद्या संपूर्ण तरुण पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण होईल. ही केवळ कायद्याची लढाई नसून समाज आणि भविष्यातील पिढी वाचविण्याची लढाई आहे,” अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

पनवेलमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन; पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांना वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट

Next Post

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In