• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिडकोकडून 28 मेपासून 10 टक्के पाणी कपात; विविध नोड्ससाठी बंद पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
सिडकोकडून 28 मेपासून 10 टक्के पाणी कपात; विविध नोड्ससाठी बंद पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर
0
SHARES
94
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल|प्रतिनिधी| श्रीनाथ दत्तात्रेय लाड: धरणांमधील घटता जलसाठा, वाढती उष्णता आणि हवामान विभागाने व्यक्त केलेल्या एल-निनो व आयओडीच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने आपल्या पाणीपुरवठा क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात गुरुवार, दि. 28 में 2026 पासून लागू होणार असून पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सिडको क्षेत्राला हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण तसेच मजीप्रा यांच्या पाताळगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने जलाशयांतील पाण्याची बाष्पीभवन वाढत असून उपयुक्क्त जलसाठा जपाट्याने कमी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच पावसाळा उशिारासुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.

1)खारघर-सोमवार
2)तळोजा-शुक्रवार
3)कळंबोली व नावडे-बुधवार
4)कामोठे-शुक्रवार
5)नवीन पनवेल (पूर्व)-सोमवार
6)नवीन पनवेल (पश्चिम)-मंगळवार
7)करंजाडे-गुरुवार
8)काळुंदे-शुक्रवार
9)उलवे (सेक्टर-२, ३, ५, ६, १९, २९९, २०, २९,२३, गव्हाण गाव व मोरावे गाव)-मंगळवार
10)उलवे (सेक्टर-८, ०ए, ९, १०वी, १६, १६ए, १५, १७, १८, २४, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोगरी)-शुक्रवार
अ) उलवे (सेक्टर-२५ व २५ए) ब) द्रोणागिरी- रविवार

वरील वेळापत्रकानुसार संबंधित नोड / विभागामध्ये पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर काही कालावधीत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी वापरताना आवश्यक दक्षता घ्यावी.

सिडको प्रशासनाकडून सर्व जलस्रोवांतील उपलब्ध साठा, दैनंदिन पाणीपुरवठा आणि स्थानिक वितरण व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यात येत असून भविष्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही पाणी कपात लागू करण्यात आली आहे. हेटवणे, मोरबे आणि इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन जलसाठ्यात वाढ होईपर्यंत ही कपात कायम राहणार असल्याचे स्यष्ट करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनीदेखील त्यांच्या कार्यक्षेत्रात पाणी कपातीचे निर्णय घेतले आहेत.

सिडको पाणीपुरवठा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक, गूहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वाहन धुणणे, पिण्यायोगय पाण्याचा अनावश्यक वापर, पाण्याची गळती दुर्लक्षित ठेवणे, साठवण टाक्या ओव्हरष्लो होणे अशा बाबी टाळाव्यात.जलसंपत्तीचा जबाबदारीने वापर करून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक काळ सुरुळीत ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

Next Post

श्रीमज्ञ्जगद्गुरु पलसिद्ध मठात अधिक मासानिमित्त भव्य शिवमहापुराण कथा, आज पालखी सोहळा, देखावे

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
श्रीमज्ञ्जगद्गुरु पलसिद्ध मठात अधिक मासानिमित्त भव्य शिवमहापुराण कथा, आज पालखी सोहळा, देखावे

श्रीमज्ञ्जगद्गुरु पलसिद्ध मठात अधिक मासानिमित्त भव्य शिवमहापुराण कथा, आज पालखी सोहळा, देखावे

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In