• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील साकत परिसरात सोमवारी दुपारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा धक्का लागून बैलगाडीतील दोन बैल जागीच ठार झाले. सुदैवाने बैलगाडीतील पाच शेतकरी थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, साकत परिसरातील शेतकरी संभाजी वराट हे आपल्या कुटुंबासह बैलगाडीतून शेताकडे जात होते. बैलगाडीत पाच जण प्रवास करत होते. दरम्यान, रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या जिवंत वीजवाहिनीवरून बैलगाडी गेल्याने बैलांना जोरदार विजेचा धक्का बसला.

वीजप्रवाह सुरू असल्यामुळे दोन्ही बैल जागीच मृत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाडीत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे बैलगाडीतील सर्वजण सुरक्षित बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळला.

या दुर्घटनेत संभाजी वराट यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बैलांची जोडी गेल्याने संबंधित शेतकरी कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे साकत परिसरासह संपूर्ण जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रस्त्यावर जिवंत विजेची तार पडलेली असताना महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत पीडित शेतकरी कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Ad 1
Previous Post

मारेगाव, पोलिसांची मोठी कारवाई. दोन वाहने जप्त तीन आरोपींना अटक

Next Post

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In