• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी!घनकचरा, बांधकामावरून मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर.

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा पालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी!घनकचरा, बांधकामावरून मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर.
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.29 (का.प्र.)
शुक्रवार आयोजित करण्यात आलेली शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कमालीची वादळी आणि ऐतिहासिक ठरली. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार खडाजंगीमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि आरोग्याच्या मुद्द्यांवरून सभागृहात अक्षरशः ठिणग्या उडाल्या. त्यातच बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिल्याने खळबळ माजली.
नगरपालिकेच्या कै.काशिनाथ सजन पाटील सभागृहात दुपारी ठीक साडेतीन वाजता या सभेला सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिजीत पाटील होते, तर उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील व मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. विषय पत्रिकेवरील एकूण ३० विषयांपैकी १८ विषयांना मंजुरी देण्यात आली, ८ विषय नामंजूर करण्यात आले, तर ४ विषय स्थगित ठेवण्यात आले. दरम्यान, आयत्या वेळच्या सर्व विषयांना सभागृहाने मंजुरी दिली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मुख्याधिकारी-नगराध्यक्षांना धरले धारेवर-
सभेची सुरुवात शांततेत झाली असली तरी, बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी ३ ते ४ कळीच्या मुद्द्यांवरून थेट मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना धारेवर धरत जाब विचारण्यास सुरुवात केली. घनकचरा व्यवस्थापन आणि स्थापत्य बांधकामाच्या विषयांवरून वाल्हे यांची मुख्याधिकारी तसेच बांधकाम अभियंत्यांशी जोरदार खडाजंगी झाली.वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर चर्चा सुरू असताना संतोष वाल्हे आणि अॅडव्होकेट दानिश पठाण यांच्यात असंविधानिक शब्दांच्या वापरावरून जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सभागृहातील वातावरण कमालीचे तापल्याने, नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी संतप्त होत संतोष वाल्हे यांना निलंबित करण्यात यावे अशी नोंद घेण्याची थेट सूचनाच सभा लिपिकाला दिली. नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे सभागृहात एकच शांतता पसरली.

प्राथमिक शाळा इमारत आणि आरोग्य विभागावरून प्रशासन लक्ष्य-
सभेत मुनेश जगदेव यांनी प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीबाबत तीव्र हरकत घेतली, ज्यावर सभागृहात मोठी चर्चा झाली. तसेच आरोग्य विभागाच्या कारभारावरूनही नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी फक्त उत्तरे देऊन वेळ निभावून नेतात. सत्ताधारी आणि प्रशासनाने सभागृहाची दिशाभूल करू नये. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने उत्तरे दिली पाहिजेत,” अशी आक्रमक मागणी यावेळी सदस्यांनी केली.विषय क्रमांक २८ व २९ वर सर्वच सदस्यांनी हिरीरीने चर्चेत भाग घेतला. काही विषयांवर सत्ताधारी व विरोधकांचे एकमत दिसले, तर अनेक विषयांवर तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले.वादविवादाच्या गदारोळातही आयत्या वेळच्या काही महत्त्वपूर्ण विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली, यामध्ये कुकडेल भागातील पोलीस चौकीची उभारणी.पोलीस स्टेशन प्रवेशद्वारावरील अडथळे दूर करणे.शहरातील उघड्यावरील मांस विक्री तातडीने बंद करणे.राणा प्रताप स्मारक उभारणे.स्वर्गीय पी. के. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मारकाचा विषय निघताच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी त्याला एकमुखी मंजुरी दिली. यावर नगराध्यक्षांसह सत्ताधारी सदस्यांनी, सदर विषयातील सर्व कायदेशीर बाबी तपासून मंजुरी देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान , घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत अभियानावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधी गटाचे हरीश पाटील यांनी प्रशासनाला थेट सुनावले की, शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणे शक्यच नसेल तर निधी परत जाऊ द्या, स्वच्छ भारत अभियानाच्या बाबतीत आपण भविष्यात ठोस निर्णय घेऊ!”त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सभेत उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील, प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी, हरीश पाटील, भावना कदम, सागर मराठे, मुनेश जगदेव आणि वसीम तेली यांनी विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण शब्दांत आपली मते मांडली. एकूणच आजची सर्वसाधारण सभा विकासकामांपेक्षा आरोप-प्रत्यारोप आणि वादळी घडामोडींमुळेच चर्चेचा विषय ठरली आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

वृंदावन नगरातील वाढीव पाणीपुरवठा योजना कामाची उपनगराध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी.

Next Post

जळकोट शहरातील जनगणना सर्वेक्षणाचा यशस्वी समारोप; प्रा. बापूसाहेब शिवाजीराव वडजे यांचे कौतुक

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
जळकोट शहरातील जनगणना सर्वेक्षणाचा यशस्वी समारोप; प्रा. बापूसाहेब शिवाजीराव वडजे यांचे कौतुक

जळकोट शहरातील जनगणना सर्वेक्षणाचा यशस्वी समारोप; प्रा. बापूसाहेब शिवाजीराव वडजे यांचे कौतुक

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In