• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बळीराजा संकटात: शेतकरी व शेती जगवायची असेल तर धोरण बदला

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
बळीराजा संकटात: शेतकरी व शेती जगवायची असेल तर धोरण बदला
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

बळीराजा संकटात: शेतकरी व शेती जगवायची असेल तर धोरण बदला!
सर्वांना जगायचे असेल तर शेतकर्‍यांना जगवा!

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

— बोरशे गुरुजी
9403500477
रा. करजगांव ता. भोकरदन
जि. जालना

शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतात, पण आज त्याच पोशिंद्याच्या ताटातच अन्न नाही, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे व्यवस्थेची उदासीनता यामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.त्यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.

  1. निसर्गाचा लहरीपणा आणि वाढता खर्च!
    कधी अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, तर कधी दुष्काळामुळे पेरणी केलेले बीही उगवत नाही. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यालाच बसत आहे.

या संकटात भर पडते ती उत्पादन खर्चाची. डिझेल-पेट्रोलच्या दरात 15 मे 2026 पासून लिटरमागे 3 रुपयांची वाढ झाली आहे. अजुनही वाढ होत आहे.ट्रॅक्टरने नांगरणी, पाणी देणे, माल बाजारात नेणे – सर्वच महाग झाले.शिवाय खते, बियाणे, कीटकनाशकांचे भाव गगनाला भिडले आहेत.दुकानदारांची मनमानी, बॅंकाची दिरंगाई प्रशासनाचा भ्रष्टाचार या सर्वांचा त्रास शेतकर्‍यांलाच सहन करावा लागतो.

पूर्वी बैलाने शेती व्हायची, आता मजूर मिळत नाहीत म्हणून यंत्राशिवाय पर्याय नाही. पण यंत्राने शेती करणेही परवडत नाही. इंधन टंचाई, खत,बी,औषध दरवाढीचा फटका शेतकर्‍यांना बसु नये यासाठी शासनाने एकरी दहा हजार रुपये उत्पादन खर्च अनुदान द्यावे.शेती करणे ही फक्त शेतकर्‍यांचीच नाही तर ज्यांना खायला लागते त्या सर्वांची गरज आहे.पेरणीपासून काढणीपर्यंत सगळा खर्च वाढला, पण उत्पन्न मात्र तेच.

  1. धोरणांचा अभाव आणि बाजारभावाचा प्रश्न!
    शेतकऱ्यांची खरी शोकांतिका ही आहे की खर्च वजा जाता हातात नफाच उरत नाही. कारण मालाला बाजारात हमीभाव मिळत नाही. MSP जाहीर होतो, पण प्रत्यक्ष खरेदी होत नाही. व्यापारी मनमानी भावाने माल घेतात. कांदा, सोयाबीन, कापूस पिकवणाऱ्याला विचारा, त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

सरकारकडे शेतीसाठी दीर्घकालीन, ठोस धोरण नाही. पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. कर्जमाफीची घोषणा होते, पण अंमलबजावणी कागदावरच राहते. सिंचनाच्या योजना अर्धवट पडून आहेत.

  1. इंधन दरवाढीचा दुहेरी फटका!
    सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोलवर प्रति लिटर 20 रुपये आणि डिझेलवर 100 रुपये इतका तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे दरवाढ अटळ होती असे सरकारचे म्हणने आहे.परंतु जेव्हा कंपन्यांनी नफेखोरी केली तेंव्हा सर्व गुपचुप होते.पण या दरवाढीचा थेट परिणाम शेतीवर झाला.

डिझेल महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आणि भाजीपाला, फळे, दूध महागणार आहे. परंतु शेतकर्‍यांना या भाव वाढीचा फायदा न होता तोटाच होणार आहे. पंतप्रधानांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे, पण शेतकऱ्याने ट्रॅक्टर बंद केला तर पेरणी कशी करणार?

  1. परिणाम: जमिनी विकल्या जात आहेत!
    या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहे. अनेकांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जमिनी विकल्या. गाव ओस पडत आहेत, तरुण शहराकडे पळत आहेत. “शेती परवडत नाही” हे वाक्य आता प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी आहे.

मार्ग काय ?
शेती वाचवायची असेल तर तीन गोष्टी तातडीने कराव्या लागतील:

  1. उत्पादन खर्चावर नियंत्रण : खते, बियाणे, डिझेल यावर अनुदान देऊन खर्च कमी करा. सौर पंप, ठिबक सिंचन यांना प्रोत्साहन द्या.
  2. हमीभावाचा कायदा : MSP चा कायदा करून शेतमालाला उत्पादन खर्च + 50% नफा मिळेल याची हमी द्या. सरकारी खरेदी केंद्रे प्रत्येक तालुक्यात तालुक्यातील मोठ्या गांवात सुरू करा.
  3. हवामान आधारित नियोजन : पीक विमा योजना सोपी करा. 48 तासांत नुकसान भरपाई मिळेल अशी व्यवस्था करा. हवामान बदलाला तोंड देणारी बियाणी संशोधित करून मोफत द्या.

शेतकरी जगला तरच देश जगेल. केवळ घोषणा नको, तर कृती हवी. कारण निसर्गाची साथ, शेतीविषयक योग्य धोरण आणि मालाला परवडणारा बाजारभाव – या तीन गोष्टींशिवाय शेतकरी शेती करूच शकत नाही. आज नाही सुधारलो, तर उद्या आयात केलेले धान्य खाण्याची वेळ येईल.सर्वांना जगायचे असेल तर शेतकर्‍यांना जगवा!

— बोरशे गुरुजी
9403500477
रा. करजगांव ता. भोकरदन
जि. जालना

बळीराजाला वाचवा!शेती वाचवा!

Ad 1
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवली येथे वंचित बहुजन आघाडीकडून विनम्र अभिवादन!

Next Post

गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांची पिक विम्यासाठी तहसीलदारांकडे धाव; सात दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांची पिक विम्यासाठी तहसीलदारांकडे धाव; सात दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांची पिक विम्यासाठी तहसीलदारांकडे धाव; सात दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In