• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांची पिक विम्यासाठी तहसीलदारांकडे धाव; सात दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांची पिक विम्यासाठी तहसीलदारांकडे धाव; सात दिवसांत निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गंगाखेड | प्रतिनिधी राजेश वट्टमवार

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव व राणी सावरगाव या मंडळांमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, विमा भरूनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नियमितपणे विमा हप्ता भरला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाच्या योजनेतून आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र अनेक महिने उलटूनही विमा मंजूर न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून गुंजेगाव सज्जा व राणी सावरगाव मंडळातील पात्र शेतकऱ्यांना खरीप २०२५-२६ चा पीक विमा तात्काळ मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असून अनेकांना कर्जाचा भार सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, निवेदन दिल्यानंतरही सात दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न झाल्यास सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. यावेळी उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हे निवेदन श्रीमती शांताबाई देवराव माने, बालासाहेब कोंडीबा मोठे, विजय प्रल्हाद मुंडे, समाधान चिलगर, भास्कर ठावरे, तुकाराम हाके यांच्यासह इतर शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाकडे सादर केले.

दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा आणि त्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे आता गुंजेगाव व राणी सावरगाव मंडळातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

– राजेश वट्टमवार, प्रतिनिधी, गंगाखेड

Tags: Rajeshwar Wattamwar
Previous Post

बळीराजा संकटात: शेतकरी व शेती जगवायची असेल तर धोरण बदला

Next Post

मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात दमदार निवड!

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
17
Next Post
मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात दमदार निवड!

मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात दमदार निवड!

ताज्या बातम्या

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

September 1, 2026

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

September 1, 2026
🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

🏥 पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न!

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In