• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२५ वर्षांनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन; नेताजी सुभाष विद्यालयात आठवणींना उजाळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
२५ वर्षांनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन; नेताजी सुभाष विद्यालयात आठवणींना उजाळा
0
SHARES
37
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या सन 2000-2001 दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तब्बल २५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विशेष सोहळ्यास पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणारे सर्व माजी शिक्षकवृंद, शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका श्रीमती दातार मॅडम तसेच दहावी बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पोपळघट, अमोल चिंचाने आणि प्रदीप भस्के यांनी केले.

स्वागत नृत्याच्या माध्यमातून कुमारी स्नेहल मिसाळ हिने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेला ‘गुरुजन कृतज्ञता सोहळा’ हा विशेष आकर्षण ठरला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री टेहरे यांनी केले.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून देत शालेय जीवनातील आठवणी, गमती-जमती आणि बालपणीचे अनुभव सांगून जुन्या दिवसांना उजाळा दिला. उमेश टोके, ललित चव्हाण, विनायक बाबळगावकर, आलोक चौधरी, सुभाष अंबट, सुधाकर चिंचाणे, वैजनाथ चिंचाणे, मुनाफ खान दुर्रानी, भाग्यश्री कुलकर्णी आणि संदीप जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

सोहळ्यात शिक्षकांचा सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील संस्कार, नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि आई-वडिलांचा सन्मान करण्याचा संदेश दिला.

दहावी 2000-2001 बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दहा सीलिंग फॅन स्नेहभेट म्हणून प्रदान केले. तसेच दरवर्षी शाळेला आवश्यक साहित्य देण्याचा संकल्पही करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यमान उपनगराध्यक्ष आलोक भैया चौधरी यांचा शिक्षकांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

दुपारी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. तसेच पद्माकर आढाव यांनी उपस्थितांना कुल्फीचा आस्वाद दिला. कार्यक्रमानंतर गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, टंग ट्विस्टर यांसारख्या विविध खेळांमध्ये सहभागी होत सर्वांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले. शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये बसून जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रांनी मनमोकळा संवाद साधला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश भंडे यांनी पुढाकार घेत सर्व शिक्षकांना निमंत्रित करण्याचे काम केले. त्यांना सुधाकर चिंचाणे, वैजनाथ चिंचाणे, योगेश गिराम, उमेश टोके, प्रकाश पोपळघट, सीमा बनकर, किरण माळी, भाग्यश्री कुलकर्णी, जयश्री टेहरे, माणिक चव्हाण, अमोल चिंचाने, प्रदीप भस्के, पद्माकर आढाव, संदीप जोशी आणि दत्ता धोपटे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सीमा बनकर यांनी केले, तर छायाचित्रणाची जबाबदारी दत्ता धोपटे यांनी समर्थपणे पार पाडली.

२५ वर्षांनंतर भरलेल्या या स्नेहसंमेलनाने गुरु-शिष्य आणि मित्रांच्या नात्यांना नव्याने उजाळा मिळाला असून उपस्थितांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. 💐📚🎓

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

अखेर ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक; महायुतीचे विधान परिषदेसाठी जागावाटप जाहीर

Next Post

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In