• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्याच्या लेकींनी मोठ्या उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
अहिल्याच्या लेकींनी मोठ्या उत्साहात साजरी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती ‘अहिल्या सखी मंच’च्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींचे आजोळ असलेल्या चोराखळी येथील पापनाश मंदिरात अभिषेक, पूजन व आरती करून जयंती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

जयंतीनिमित्त नवजात कन्यांचे स्वागत करून मातांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मातांना वस्त्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुलींनी यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत होऊन माता अहिल्यादेवींच्या आदर्शांचा वारसा पुढे न्यावा, तसेच मुलींचे नाव ‘अहिल्या’ ठेवण्याचे आवाहनही मंचाच्या वतीने करण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारातून लोककल्याण, धर्मकार्य, समाजसेवा आणि न्यायनिष्ठेचा आदर्श घालून दिला. भुकेल्यांची भूक आणि तहानलेल्यांची तहान ओळखून त्यांनी स्वतःच्या खजिन्यातून लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला. देशभर उभारलेली मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि सांस्कृतिक केंद्रे आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत अहिल्या सखी मंचाने ‘अन्नपूर्णा मोफत अन्नछत्राला’ अन्नदान करून गरजू रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एका दिवसाच्या भोजनाची व्यवस्था केली.

“स्नानाने देहशुद्धी, ध्यानाने मनशुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते” या अहिल्यादेवींच्या जीवनमूल्यांचा प्रचार करण्यासाठी मंचाच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात आले. संस्कृती ही भोगावर नव्हे तर त्यागावर उभी असते आणि प्रत्येक मानवामध्ये ईश्वराचा अंश आहे, या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्या सखी मंचच्या कार्यकारिणी अध्यक्षा डॉ. शैलजा कुलकर्णी, उपाध्यक्षा ॲड. जयश्री तेरकर, सचिव उषा लांडगे, कोषाध्यक्षा प्रमिला बावकर, सहसचिव शितल करडे, सहकोषाध्यक्षा मानसी डोलारे यांच्यासह मंचातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जयंतीनिमित्त आयोजित उपक्रमांमुळे परिसरात भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

तूगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणार्या गावगुंडान तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको.

Next Post

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलाबरोबर केला वाढदिवस साजरा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In