• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा प्रदूषणमुक्त करा; अन्यथा ३ जूनला कृष्णा पाणीपुरवठा योजनेला टाळे ठोकू – धनाजी चुडमुंगे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
पंचगंगा प्रदूषणमुक्त करा; अन्यथा ३ जूनला कृष्णा पाणीपुरवठा योजनेला टाळे ठोकू – धनाजी चुडमुंगे
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने सोमवारी कुरुंदवाड येथील नगरपालिका चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास ३ जून रोजी मजरेवाडी-बस्तवाड येथील इचलकरंजी कृष्णा पाणीपुरवठा (जॅकवेल) योजनेच्या कार्यालयाला टाळे ठोकून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी दिला.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

यावेळी बोलताना धनाजी चुडमुंगे म्हणाले की, पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. इचलकरंजी येथील प्रोसेस उद्योगांमधून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असून त्यामुळे नदीचे प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील ११ गावांतील नागरिकांना बसत आहे.

प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या उद्योगांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणा आणि इचलकरंजी महापालिका त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नदीतील रासायनिक सांडपाण्यामुळे पाणी, मासे, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

धरणे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नायब तहसीलदार विलास भिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलकांच्या भावना आणि मागण्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

“पंचगंगा प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे”, “रासायनिक सांडपाणी नदीत मिसळणे तातडीने थांबवावे” अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, अविनाश पाटील, विश्वास बालिघाटे, राजू आवळे, रशीद मुल्ला आदींनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात नागेश काळे, बंडू बरगाले, सुनील सावंत, अभय पाटुकले, महिपती बाबर, सुदर्शन माळी, जयपाल बलवान, आप्पा बंडगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

Ad 1
Previous Post

पंचगंगा प्रदूषणाचा लढा अंतिम टप्प्यात; ११ गावांनी साथ दिल्यास नदी प्रदूषणमुक्त करू – धनाजी चुडमुंगे

Next Post

छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुहास शिरसाठ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
23
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
12
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
6
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
25
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुहास शिरसाठ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर–जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुहास शिरसाठ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In