• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश; पारधीवाड्यातील नागरिकांच्या घरांना मिळणार कायदेशीर हक्क

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश; पारधीवाड्यातील नागरिकांच्या घरांना मिळणार कायदेशीर हक्क
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

परतूर | प्रतिनिधी

परतूर शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील पारधीवाडा परिसरातील नागरिकांचा तब्बल ३५ वर्षांपासून सुरू असलेला घर व जमिनीच्या हक्कासाठीचा संघर्ष अखेर यशाच्या मार्गावर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण धोरणानुसार २०११ पूर्वीपासून काबीज असलेल्या घरांची व जागांची मोजणी सुरू करण्यात आली असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ॲड. सुरेश काळे यांनी हा विषय माजी मंत्री तथा आमदार Babanrao Lonikar यांच्याकडे मांडला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर भूमी अभिलेख विभागामार्फत टीएलआर व एसएलआर यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

परतूर नगरपरिषदेमार्फत नागरिकांसाठी विशेष अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून २०११ पूर्वीच्या वास्तव्यास किंवा ताब्यासंदर्भातील कोणताही वैध पुरावा जोडून अर्ज सादर करावा, असे आवाहन ॲड. सुरेश काळे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घर व जमिनीच्या नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या उपक्रमासाठी ॲड. सुरेश काळे यांनी आमदार बबनराव लोणीकर, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, परतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी इंगोले तसेच भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत, “हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासून हक्कासाठी झगडणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आता आमच्या घरांवर कायदेशीर हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे,” अशी भावना व्यक्त केली.

३५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शासनस्तरावर सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे पारधीवाड्यातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; साखरपुड्याचा मंडप कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

त्रिवेणी सन्मानाने गौरव: ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांचा रायगडात सत्कार

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
23
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
12
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
6
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
25
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
त्रिवेणी सन्मानाने गौरव: ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांचा रायगडात सत्कार

त्रिवेणी सन्मानाने गौरव: ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांचा रायगडात सत्कार

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In