• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

त्रिवेणी सन्मानाने गौरव: ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांचा रायगडात सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
त्रिवेणी सन्मानाने गौरव: ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांचा रायगडात सत्कार
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

उरण | प्रतिनिधी –

रायगड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांना विविध संस्थांकडून एकाच कार्यक्रमात तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या विशेष गौरवामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

Child Care Samajik Sanstha Raigad यांच्या वतीने अंकुश महाराज यांना ‘रायगड विशेष सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच Aawaz Mahamumbaicha Channel यांच्या वतीने ‘महा गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय Dronagiri Sports Association Uran यांनीही त्यांचा विशेष सन्मान केला.

या तिहेरी सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ह.भ.प. अंकुश महाराज म्हणाले, “अधिक मासात तीन पुरस्कारांनी सन्मानित होणे म्हणजे माझ्यासाठी त्रिवेणी संगमच आहे.”

यावेळी त्यांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आदिवासी वाड्यांमध्ये संस्था राबवत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे त्यांनी अभिनंदन करत संस्थापक अध्यक्ष विकास कडू आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.

गेल्या नऊ वर्षांपासून चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘रायगड विशेष’ पुरस्काराने गौरवित आहे.

ह.भ.प. अंकुश महाराज कुमठेकर यांना यापूर्वी कोकण रत्न, कला रत्न आणि कला गौरव यांसारख्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शारजा, दुबई येथे आयोजित भजन कार्यक्रमात गायन सेवा दिली होती. सध्या ते परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्यासोबत गायन सेवा बजावत असून महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकारांना गायन-वादनाची साथ देत आहेत. आगामी सप्टेंबर महिन्यात त्यांना यूकेमधील London येथे गायनासाठी जाण्याची संधी लाभणार आहे.

कोकणातील संत परंपरेचे वारसदार असलेल्या अंकुश महाराजांनी अल्पवयातच वारकरी संप्रदायात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील हरिपाठ आणि भजन सेवा विशेष आकर्षण ठरत आहेत.

पुरस्कार वितरण समारंभात चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील आणि द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाणिक म्हात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद खारपाटील यांनी मानले.

Previous Post

माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश; पारधीवाड्यातील नागरिकांच्या घरांना मिळणार कायदेशीर हक्क

Next Post

ब्राम्हगाव येथील हनुमान मंदिरातील मूर्तीचा अवमान; घटनेचा निषेध, आरोपींचा शोध सुरू

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
5
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
8
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
8
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
7
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
16
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
19
Next Post

ब्राम्हगाव येथील हनुमान मंदिरातील मूर्तीचा अवमान; घटनेचा निषेध, आरोपींचा शोध सुरू

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In