• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार
0
SHARES
554
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

शिरूर नगरपरिषद प्रशासनामार्फत नुकत्याच राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या व टपऱ्या संबंधित विक्रेत्यांना कोणताही दंड अथवा शुल्क न आकारता तात्काळ परत करण्यात याव्यात तसेच त्यांच्यासाठी योग्य व नियोजित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक निलेश पवार यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये शहरातील अनेक हातगाड्या व टपऱ्या जप्त करण्यात आल्या. या हातगाड्या आणि टपऱ्या अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून दैनंदिन उत्पन्नावर परिणाम झाल्याने उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, कारवाईपूर्वी विक्रेत्यांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नाही तसेच त्यांच्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अनेक विक्रेत्यांना आर्थिक फटका बसला असून त्यांच्या कुटुंबांवर संकट आले आहे.

या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून जप्त करण्यात आलेल्या सर्व हातगाड्या व टपऱ्या संबंधितांना कोणताही दंड अथवा शुल्क न आकारता परत देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक निलेश पवार यांनी केली आहे. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून हातगाडी व टपरीधारकांसाठी नियोजित, सुरक्षित आणि कायमस्वरूपी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.

पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला अथवा फुटपाथवर व्यवसाय करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होतील, सार्वजनिक सुव्यवस्था राखली जाईल आणि विक्रेत्यांच्या रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी प्रितीम पाटील यांनाही देण्यात आली. यावेळी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, सागर नरवडे तसेच नगरसेविका सुनिता भुजबळ उपस्थित होत्या.

गरीबांच्या उदरनिर्वाहासाठी पुढाकार

अतिक्रमण हटाव कारवाईनंतर रोजगारापासून वंचित झालेल्या हातगाडी व टपरीधारकांना दिलासा मिळावा, त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण व्हावे आणि शहरातील वाहतूक व सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने नगरसेवक निलेश पवार यांनी प्रशासनाकडे ही मागणी केल्याने संबंधित विक्रेत्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Avinash Ghogare
Previous Post

पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावरील हल्ल्याचा टेंभुर्णीत निषेध

Next Post

लावा येथे गायीच्या वासराचे शीर आढळल्याने खळबळ; गुन्हा दाखल

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
लावा येथे गायीच्या वासराचे शीर आढळल्याने खळबळ; गुन्हा दाखल

लावा येथे गायीच्या वासराचे शीर आढळल्याने खळबळ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In