• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी :

कन्नड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वाढत्या महागाईविरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी, युवक, महिला आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावेळी माजी आमदार नामदेवराव पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करत महागाई नियंत्रणात आणण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. खतांच्या किमती गगनाला भिडल्या असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र सरकारला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. महागडी खते आणि शेतीवरील वाढलेला खर्च उधारीवर भागवून शेतकरी उत्पादन घेतो, मात्र पीक बाजारात आल्यानंतर त्याला योग्य भाव मिळत नसल्याने तो आर्थिक संकटात सापडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाढती महागाई तात्काळ नियंत्रणात आणावी, अन्यथा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सोनवणे यांना देण्यात आले.

या आंदोलनात नगराध्यक्ष फरीन बेगम, अहमद अली भैया, अजीज नगरसेवक, तारक सेठ, शहाबाज बागवान, संजय भालेराव, योगेश अंभोरे, मोगल वाघ, राजू धनेधर, दिनकर जाधव, नाना भाऊ मनोहर जाधव तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आव्हाळे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते.

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाचे जीवन अधिक कठीण होत असल्याने शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

Previous Post

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In