• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

पनवेल | प्रतिनिधी

सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी पनवेल महानगरपालिका राबवत असलेले कार्य अभिमानास्पद असून राज्यातील इतर महापालिकांसाठी आदर्शवत आहे. महापालिकेने राबविलेली विविध कल्याणकारी धोरणे आणि उपक्रम इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनीही अवलंबावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी केले.

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यासाठी मुकेश सारवान यांनी गुरुवार, दि. ४ जून रोजी पनवेल महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बाबन मुकादम, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, मंगला माळवे, स्वरूप खारगे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रुपाली माने, शहर अभियंता संजय कटेकर तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी शासन निर्णयानुसार वारसाहक्क नियुक्तीच्या प्रकरणांची माहिती देत सफाई कामगारांची मंजूर, भरलेली आणि रिक्त पदे यांचा तपशील सादर केला. तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही दिली.

उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, विविध स्पर्धा आणि देण्यात येणाऱ्या भत्त्यांबाबत सविस्तर माहिती दिली. तर शहर अभियंता संजय कटेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून ५४ मोफत मालकी हक्काच्या सदनिकांच्या उपक्रमाची माहिती दिली.

मुकेश सारवान यांनी पनवेल महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक उन्नतीसाठी राबविलेल्या विविध योजनांचे कौतुक केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान उपस्थित सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनीही महापालिकेचे धोरण सकारात्मक व सहकार्यपूर्ण असल्याचे सांगितले. “सफाई कर्मचारी संघटनांकडूनही पालिकेच्या कार्याचे कौतुक होत असेल, तर हे निश्चितच भूषणावह कार्य आहे,” असे समाधानकारक उद्गार मुकेश सारवान यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपायुक्त स्वरूप खारगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

कर्जतमधील आर्डे येथे जमिनीच्या ताब्यावरून वाद; वृद्ध दाम्पत्यांना दादागिरी करून कंपाउंड उभारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

Next Post

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
146
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
6
Next Post
कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In